Saturday 2 May 2020

प्रदूषण देतेय दम्याला निमंत्रण

मे महिन्याचा पहिला मंगळवार जगभरात दमा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा  5 मे म्हणजे हा दिवस साजरा होतोय. फुफ्फुसांचा अतिशय चिवट असा हा आजार आहे. जगभरातील दमेकऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के दमेकरी भारतीय आहेत. हा रोग थोडा अनुवंशिक असला तरी दम्याच्या वाढत्या प्रमाणामागे प्रदूषण हे  मुख्य कारण आहे. श्वसनमार्गात दाह निर्माण  करणारे वातावरणातले विषाणू आणि  अर्थातच अॅलर्जीला कारणीभूत  असणारे घरातील प्रदूषणकारी घटक  दमा होण्यासाठी धोकादायक ठरू  शकतात.
गरोदर स्त्रीला धूम्रपानाची  सवय असेल तर जन्माला येणाऱ्या  अपत्यांमध्ये दम्याचे प्रमाण आढळून  आले आहे. या मुलांचा दमा अधिक  तीव्र प्रकारचा असू शकतो. गर्भातील अपुऱ्या वाढीमुळेही अशा बालकांना किंवा  दमा होऊ शकतो.
दम्याचे निदान पल्मोनरी फंक्शन  टेस्ट या सोप्या चाचणीद्वारे होते.  कोणतेही इंजेक्शन न घेता, कोणताही  त्रास न होता-अगदी विनासायास अशी
ही चाचणी आहे. दमा कोणालाही  होतो. आपल्या शरीरातील विशिष्ट  गुणसूत्रं दम्याशी संबंधित असतात.
त्या गुणसूत्रावरून दम्याचे निदान करता  येते. आई- वडील दोघेही दम्याचे रुग्ण  असतील तेव्हा दमा व्हायची शक्यता  अधिक असते. आहारातील अनेक
घटकांची विशेषतः लोह किंवा ब  जीवनसत्त्वाची कमतरता असल्यामुळे  रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण
कमी होते म्हणजे जेव्हा अॅनिमिया किंवा पांढररोग होतो तेव्हा धाप लागू  शकते. मासा गिळणे किंवा एखाद्या पुडीतील औषध खाणे असे अघोरी उपचार करू नयेत. शास्त्रशुद्ध उपचार न घेतल्यास श्वासनलिकांची हानी होऊ शकते, फुप्फुसांची हानी होऊ शकते. दीर्घकालीन-त्रासदायक असा हा आजार टाळण्यासाठी नियमितपणे  काळजी आणि औषधे घ्यायला हवीत. विशेषतः श्वासावाटे घेतली जाणारी
औषधे व्यवस्थितपणे घेतात त्यांना दम्यावर मात करता येते. दम्यामुळे माणूस सहजासहजी मृत्युमुखी पडत
नाही. मात्र, दुर्लक्ष किंवा उपचारांतील हेळसांडामुळे आणि इतर काही  विकार असतील तेव्हा दमा जीवघेणा अॅनिमिया ठरू शकतो.

No comments:

Post a Comment