Sunday 29 March 2020

गूळ खा,मस्त राहा

गूळ आपल्या आहारात असायला हवा. त्याची कारणे पुष्कळ आहेत. पण आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून कांहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

Tuesday 3 March 2020

मुळा खा, आरोग्य सांभाळा

आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. मुळा हा त्यापैकीच एक. उग्र वासामुळे मुळ्याची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जात नसली तरी अधून मधून या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी हितकारी आहे. कारण त्यामध्ये अनेक पोषणमुल्ये आहेत. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी कारांवर मुळा गुणकारी आहेच त्याचबरोबर सौंदर्यवृद्धीसाठीही मुळ्याचा वापर होतो. जाणून घेऊ मुळ्याचे हे औषधी गुणधर्म..

Sunday 1 March 2020

कढीपत्ताचे औषधी गुणधर्म

कढीपत्ता हा नेहमीच्या स्वयंपाकात वापरला जाणारा घटक असून या गुणकारी घटकामध्ये अनेक गुणकारी गुणधर्म असतात. त्यामुळेच कढीपत्त्याची पाने ताटातून बाजूला काढून न ठेवता खाण्याकडे कटाक्ष ठेवावा. कढीपत्त्याच्या सेवनाने हृदयविकारावर नियंत्रण ठेवता येतं. यातील अँटिऑक्सिडंट्समुळे रक्तातलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण कमी होतं. मधुमेहावरही कढीपत्ता गुणकारी ठरतो. कारण यात मधुमेहविरोधी घटक असतात. तसंच यातील फायबरमुळे इंन्शुलनचं प्रमाण नियंत्रणात राहून रक्तातील साखरेचं प्रमाण कमी होतं. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज सकाळी रिकाम्या पोटी पाच ते सहा कढीपत्ते चावून खावेत.