एकीकडे उन्हाने काहिली तर अचानक बरसणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे वातावरण बिघडले आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो उष्माघाताचा. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. रक्तातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मंदावल्यामुळे रूग्णाला श्वास घेणे कठीण जाते.
उष्माघाताची लक्षणे
• उष्माघाताचा त्रास सुरू झाल्यास अचानक अस्वस्थ वाटणे, डोके दुखणे, चक्कर येणे अशी लक्षणे जाणवतात.
• जास्त त्रास वाढल्यास जीभ कोरडी पडणे, डिहायड्रेशन, बेशुद्ध पडणे
अशी लक्षणे जाणवू लागतात.
उष्माघातापासून बचाव असा करा
• तीव्र उन्हात बाहेर पडू नका, कष्टदायक कामे सकाळी अथवा सायंकाळी कमी तापमान असताना करा.
* दिवसभर पुरेसे पाणी प्या, अतिथंड पाणी तसेच चहा, कॉफी यांच्यासारखी गरम पेये टाळा.
*हलक्या रंगाचे आणि कॉटनचे, थोडेसे ढगळ कपडे वापरा.
• घराबाहेर पडताना गॉगल, टोपी आणि छत्रीचा वापर करा.
• उपाशीपोटी घराबाहेर पडण्याचे टाळा.
• थंड पाणी पिऊन अथवा एसीमधून थेट उन्हात जाऊ नका.
* व्यायामाचे प्रमाण वाढवू नका, कपालपट्टीवर घाम येत असल्यास व्यायाम थांबवावा.
•सकाळी अंघोळ करताना वाळा, चंदन, सारिवा, नागरमोथा यांची पावडर करून ती अंगाला चोळावी.
. दुपारची काही काळ झोप घ्यावी. पंख्याचे वारे जवळून घेऊ नये.
• मांसाहार कमीत कमी ठेवावा.
• घराबाहेर जाताना पाण्याची बाटली सोबत ठेवा.
• रसाळ फळे खा. लिंबू सरबत, करी पन्हे, डाळिंब ज्यूस, कलिंगड ज्यूस घ्या.
• फ्रीजमधील पाण्यापेक्षा माठातील पाणी प्या.
• तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन दिवसभर उन्हात ठेवावे. त्या पाण्याने
सायंकाळी लहान मुलांना अंघोळ घालावी.
* उष्माघातामुळे शरीरातील पाण्याचे व मिठाचे प्रमाण कमी होते. डोकेदुखी, डोळ्यांसमोर अंधारी येते. त्यामुळे उष्माघात टाळण्यासाठी शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढवा. सुती कपड्यांचा वापर करा.
No comments:
Post a Comment