Wednesday 20 May 2020

असे ठेवा पित्तावर नियंत्रण

पित्त किंवा ऍसिडीटी हे आजकाल अगदी लहान
मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कोणालाही होताना दिसतात. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्त पदार्थ, तेलकट पदार्थांचे सेवन करण्याकडे वाढलेला कल, झोपेच्या बदलेल्या वेळांमुळेही पित्ताचे विकार वाढले आहेत. घरच्या घरी काही उपायांव्दारेही पित्ताचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.

हे आवर्जून करा...
● शरीरातील पित्ताच्या कमी अधिक प्रमाणावरून पित्ताचे विकार ठरतात.
●पित्ताचे विकार हे पचनसंस्थेशी निगडीत असतात. मात्र संपूर्ण शरीरावर त्याचे परिणाम होताना दिसतात.
●आपण खाल्लेलं अन्न पचवणे आणि शरीरातील उष्णतेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्याचे काम पित्त करत असते.
●तहान, भूक ही पित्तामुळेच लागते. शरिराचा रंगही पित्तावरून ठरतो. पित्ताचा रंग हा पिवळा आहे. पित्त वाढल्यास पिवळा रंग वाढतो. यातून नखे, डोळे
पिवळे दिसणे अशी लक्षणे जाणवतात.
● पित्त वाढल्यास अशक्तपणा जाणवणे, चक्कर येणे, चिडचिडेपणा वाढतो.
● पित्ताचे प्रमाण कमी झाल्यास अंग जखडते, शरिरात टोचल्याप्रमाणे वेदना होतात. चव लागत नाही. अन्न पचत नाही. तसेच पित्त दुषित झाल्यास त्वचेचे विकार होतात. उदा. घामोळ्या, गोवर.
● पित्त कमी करण्यासाठी गोड, कडू, तुरट आहार घ्यावा.
●उन्हाळात सहन होईल इतक्या गार पाण्याने अंघोळ करावी. फ्रीजपेक्षा माठात थंड झालेले पाणी प्यावे.
सुगंधी वासामुळे पित्त कमी होते. त्यामुळे पाण्यात वाळा घालावा.
● उष्ण, तिखट पदार्थ खाण्याचे टाळावे. झोप आणि झोपून उठण्याच्या वेळा पाळाव्यात. रात्री उशिरापर्यंत जागरण करू नये. सकाळी सुर्योदयापुर्वी उठावे.
● औषधी तुपामुळे पित्त विकार टाळता येणे शक्य आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार विरेचन उपचार पद्धती घ्यावी.
● शीत पित्तामध्ये अंगावर पित्त उठत असेल तर पित्तावर खायचा सोडा कोरडाच लावून अर्ध्या तासाने अंघोळ करावी, म्हणजे हा त्रास कमी होतो.
● रात्रीची जागरणे, खूप काळ उपाशी राहणे, फास्ट फूडचे सेवन, अनियमित दिनचर्या यांमुळे पित्ताचे विकार वाढतात. त्यामुळे जागरण न करता रात्री लवकर झोपा. सकाळी लवकर उठा.

No comments:

Post a Comment