Monday 11 May 2020

अशी घ्या मानेची काळजी

पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी
मानदुखी आज वयाच्या २५ ते ३० वयोगटात येऊन
ठेपली आहे. वाढत्या वयाबरोबरच मान दुखीचा त्रास
टाळायचा असेल तर दैनंदिन हालचालींवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

मानदुखीची कारणे..
*सतत संगणकासमोर बसून काम करणे.
*काम करताना आपल्या मानेला पडणारा ताण म्हणजे- खुप उंचावर असणारा संगणक किंवा खूप खाली असलेला संगणक.
*भ्रमणध्वनीचा अतिवापर; ज्यामुळे मान वाकलेल्या स्थितीमध्ये राहते.
*संगणकावर काम करून मानेला तर त्रास आहेच, त्यासोबत शहरात असणारी
*वाहतुकीची कोंडी व राहते घर ते कामाचे ठिकाण, यामध्ये असणारे अंतर : ज्यामुळे वाहतुकीदरम्यान येणारा मानेवरचा ताण खूप प्रमाणात वाढत आहे.
*रस्त्यावर असलेले खड्डे, त्यामुळेसुद्धा मानेला खप हादरे बसतात. परिणामी, मानदुखीचे प्रमाण वाढते आहे.
*मानेचा त्रास होईल, अशी कामे करताना उदा. संगणकावर कामे करणारी,वाकून काम करणारी मंडळी, सतत लेखन-वाचन करणारी मंडळी यांनी आपली मान जास्त काळ एकाच रचनेमध्ये राहणार नाही, याची काळजी घ्यावी.
*वाकून काम करताना साधारणपणे एका तासात वाकलेली मान किमान दहा वेळा तरी वर करावी. भ्रमणध्वनीचा वापर गरजेनुसार करावा. किमान
दिवसभरात दहा मिनिटे सकाळी आणि दहा मिनिटे सायंकाळी मान मागे तसेच वर-खाली, उजवीकडे-डावीकडे करण्याचा व्यायाम करावा.
* संगणकावर काम करणाऱ्यांनी आपला संगणक ठराविक पद्धतीने, ठराविक उंचीवर आहे ना, याची खात्री करून घ्यावी. म्हणजे, काम करताना मान  जास्त वर अथवा खाली वाकलेली राहणार नाही.
* जर मानदुखीची सुरुवात असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक.
*रोजच्या जीवनात लागणारी उशी पण महत्त्वाची आहे. चुकीच्या उशीमुळे पण बऱ्याच जणांना मानदुखीचा त्रास होतो.
*वारंवार प्रवास करणाऱ्या मंडळींनी मानेची खूप काळजी घेणे आवश्यक आहे.
*दुखत असल्यास मानेला गरम पाण्याचा शेक घ्यावा.'
स्वयंपाक करताना आपली मान जास्त काळ खाली वाकली जाणार नाही.'याची काळजी घ्यावी.
*झोपून मोबाईल पाहणे टाळावे.
*खांद्याचे व्यायाम, भिंतींवर जोर असे मानेचा ताण कमीकरणारे व्यायाम करावेत, गाडी चालवताना जिथे धक्का बसूशकतो, अशा वेळी वेग कमी करावा.

No comments:

Post a Comment