Tuesday 5 May 2020

अशी घ्या जिभेची काळजी...

 इतर अंगांप्रमाणे जीभ हेसुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तेवढीच जिभेची काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर  लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे ही समस्या अनेकांना उद्भवते. तोंड येण्याचा त्रासही अनेकांना सहन करावा लागतो.
दैनंदिन काळजी...
• जीभ स्वच्छ करण्यासाठी टंग क्लिनरचा वापर करा.
जिभेला सर्वात आधी इन्फेक्शन होते. सकाळी उठल्यानंतर आणि सायंकाळी झोपताना नियमित चळा भराव्यात.
यामुळे येऊ शकते तोंड..
ऍनिमिया : शरीरात लोहाची कमतरता असल्याने हिमोग्लोबिन कमी होते.
• योग्य आहार, विशेषतः चौरस आहाराऐवजी जंकफूड खाणे. दात, जीभ, हिरड्या आणि तोंडाची आरोग्यदृष्ट्या योग्य स्वच्छता न राखणे.
दीर्घकाळ टिबायोटिक्स, वेदनाशामक औषधे घेणे.
तंबाखू, गुटखा, मावा, मिसरी अशा तंबाखूजन्य पदार्थांचा वापर, अतिरिक्त मद्यपान करणे,
•चहा, कॉफीसारखी अती गरम पेये अधिक प्रमाणात घेणे.
• कॅफीन आणि आम्लता जास्त असलेल्या शीतपेयांचे सेवन. मानसिक ताणतणाव, अनियमित झोप, अति मसालेदार तिखट पदार्थ खाणे.
• शरीरात रोग प्रतिकार शक्तीचा अभाव असणे.
तोंड येऊ नये यासाठी...
तोंडाची नियमितपणे आंतरबाह्य स्वच्छता ठेवावी.
• पान, तंबाखू, गुटखा, मद्यपान, गरम चहा-कॉफी सेवन नको.
* रोजच्या जेवण चौरस आहाराचे असावा. जीवनसत्त्व आणि तंतुमय पदार्थाचा समावेश असावा.
*सर्व प्रकारची तृणधान्ये, हातसडीचा तांदूळ, कोंड्यासहचा गह, मोड आलेली कडधान्ये, दूध, ज्वारी, बाजरी, नाचणी यांचा आहारात समावेश असावा.
* दिवसभरातून किमान दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.
नियमित वेळेस, रोजच्या रोज, पुरेशी झोप घेणे.
* मानसिक ताण-तणावाचे नियोजन करणे. त्यासाठी मेडीटेशन, ध्यान करावे.
* अपुरी झोप, ताण-तणाव, दगदग यांमुळे आरोग्य बिघडते. त्याचा सर्वात आधी परिणाम जिभेवर जाणवतो. त्यामुळे जिभेला स्वच्छ ठेवण्याबरोबरच विविध पौष्टिक पदार्थ खावेत.

No comments:

Post a Comment