ब्रेकफास्टचे जीवनात महत्व वाढले आहे. भारतीय पारंपरिक पद्धतीत न्याहारीचे वेगळेच महत्व सांगितले जाते. न्याहारी अथवा ब्रेकफास्ट हे दिवसभर उत्साही ठेवते. सकाळीच न्याहारीचा सल्ला दिला जातो, ज्यामध्ये भरपूर पोषक घटक असतात. पण वजन कमी झाल्याने किंवा घाईमुळे बरेच लोक नाश्ता सोडतात. त्याचबरोबर काही लोक अशा गोष्टी खातात, ज्यामुळे त्यांना नंतर पश्चाताप करावा लागतो. या गाष्टींचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या गोष्टी घेतल्याने चयापचयावर खूप वाईट परिणाम होतो.
लिंबू पाण्यासोबत मध
वजन कमी करण्यासाठी अनेक लोक लिंबू पाण्यात मध मिसळतात. पण आजकाल बाजारात भेसळ नसलेला मध मिळणे खूप अवघड आहे. या मधामध्ये भरपूर कॅलरीज असतात. त्यात हायग्लायसेमिक इंडेक्स आहे. ते रिकाम्या पोटी घेतल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे असे करणे टाळावे.
फळ टाळण्याचा सल्ला
बहुतेक लोकांना असे वाटते की सकाळी फळाची वाटी आरोग्यासाठी खूप चांगली असते. पण पोषणतज्ञ हे टाळण्याचा सल्ला देतात. त्यांच्या मते इतर पदार्थांच्या तुलनेत फळे सहज पचतात. त्यामुळ तासाभरात भूक लागते. यासोबतच सकाळी रिकाम्या पोटी आंबट फळे खाल्ल्याने अँसिडिटीचा त्रास होऊ शकतो.
एसिडिटीबाबत सजग राहा
भारतीयांना सकाळ चहा किंवा कॉफीची सवय आहे. सुस्ती दूर करण्यासाठी आणि उत्साही राहण्यासाठी बरेच लोक सकाळी रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पितात. परंतु ते पोटात असिड निर्माण करू शकतात. यामुळे पोट खराब होऊ शकते आणि पचनाशी संबंधित इतर अनेक समस्या उद्धवू शकतात. त्यामुळे सकाळी चहा किंवा कॉफी पिणे टाळा. त्याऐवजी तुम्ही इतर कोणतेही आरोग्यदायी पेय घेऊ शकता.
नाश्त्यामध्ये गोड पदार्थ नको
सकाळी नाश्त्यात गोड पदार्थ खाऊ नका. यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यामुळे तुम्ही कमी ऊर्जावान राहता. म्हणूनच सकाळी खूप गोड नाश्ता करणे टाळा.
(टीप-वरील माहितीचा उपयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
No comments:
Post a Comment