Thursday 7 May 2020

अशी घ्या डोळ्यांची काळजी

दैनंदिन जीवनात सर्वात जास्त वापरले जाणारे इंद्रिय म्हणजे डोळे. प्रत्येक क्षणी कार्यरत राहणाऱ्या डोळ्यांना झोपेपुरतीच विश्रांती मिळते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीचा सर्वाधिक प्रभाव हा डोळ्यांवर पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची  काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. तसेच लॉकडाउन काळात अनेकांचा स्क्रीनटाईम वाढलेला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. त्यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

हे आवर्जून करा...
• डोळ्यांना वरचेवर हात लावू नका. डोळे चुरचुरत असल्यास स्वच्छ हात धुवा..
• सॅनिटायझर लावून हात धुवा. त्यानंतरच डोळ्यांना हात लावा.
डोळे लाल होणे, डोळ्यांतून घाण येणे अशी लक्षणे जाणवल्यास तातडीने डोळ्यांच्या डॉक्टरांना दाखवावे.
•लॉकडाऊन काळात स्क्रीन टाईम वाढल्याने डोळ्यांवरील ताण वाढतो. त्यासाठी दर दहा मिनिटांनी दूरवर पाहात राहावे. लहान मुलांची अशी घ्या काळजी
ऑनलाईन क्लासेस, गेमिंग यांच्यामुळे लहान मुलांना स्मार्ट फोन द्यावा लागतो. लहान मुले मोबाईलवर काय पाहत आहेत, हे पालकांनी वेळच्यावेळी पाहावे. डोळ्यांना त्रास होईल, असे गेम खेळू देऊ नयेत. शक्यतो लहान मुलांना गॅझेटस् वापरण्यास देऊ नयेत.
डोळ्यांवर ताण येत असल्यास डोळ्यांवर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात.
• दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर घासावेत आणि ते अलगद दोन्ही डोळ्यांवर ठेवावेत.
• डोळे स्वच्छ करण्यासाठी डोळ्यांत पाणी सोडू नये. अणूंनी डोळे स्वच्छ होतात.
* किमान वर्षातून एकदा डोळ्यांच्या डॉक्टरांकडून डोळे तपासून घ्यावेत. मधुमेहाच्या रूग्णांनी दर सहा महिन्यांनी दृष्टीपटलाची तपासणी करून घ्यावी.
आहारात हे घ्या...
जेवणात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा. रोज एक फळ खावे. गाजर, बीट व पपई खाणे फायदेशीर ठरेल. डोळ्यांच्या आरोग्यासाठी सी जीवनसत्त्व युक्त फळे खावीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांचीही काळजी घेणे अतिशय . गरजेचे आहे. डोळ्यांना सारखा स्पर्श करू नका. मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप यांचा वापर मर्यादीत करा. डोळ्यांवर ताण आल्यास त्वरीत डॉक्टरांचा सल्ला घ्या.

No comments:

Post a Comment