Sunday 24 May 2020

पाणी पिण्याचे नियम आणि फायदे

पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून
घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत करतं.
ज्या प्रकारे अंघोळ केल्याने बाह्य शरीराची सफाई
होते त्याचप्रमाणे पाणी पिण्याने आतल्या शरीराची
सफाई होते.

नियम
◆ सकाळी उठल्यावर १ ग्लास पाणी पिण्याने आपले
अंतर्गत अवयव मजबूत होतात. सकाळी पाणी
थोडे कोमट करून पिण्याने फॅट्स कमी होतात.
◆ अंघोळीनंतर १ ग्लास पाणी पिण्याने कधीही लो
ब्लड प्रेशरची तक्रार होत नाही.
◆ जेवण्याच्या ३० मिनिटांआधी २ ग्लास पाणी पिण्याने पचनशक्ती वाढते.
◆ जेवताना पाणी न पिता जेवण झाल्यावर पाऊण
तासाने पाणी प्यावे.
◆ पाणी कधीही उभे राहून पिऊ नये.
◆ एकाचवेळी तांब्याभर पाणी पिऊ नये. झोपण्यापूर्वी १ ग्लास पाणी पिण्याने हार्टअॅटॅकसारख्या त्रासापासून सुटका मिळते.
फायदे
◆  सतत पाणी पिणाऱ्यांना मूत्रखडा विकार होण्याची
शक्यता नगण्य असते.
◆ जर शरीरातून १० टक्के द्रव्यदेखील कमी झाले तरी डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. म्हणूनच किडनीला स्वस्थ ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची गरज असते.
◆ तज्ञांनी म्हटले आहे की भरपूर पाणी पिण्याने
चेहऱ्यावर चमक येते.
◆ भरपूर पाणी पिण्याने सुरकुत्या नाहीशा होतात
आणिडोळ्यांखालील फुगीरपणाकमी होतो.

1 comment:



  1. मानवी शरीराला पाण्याची नितांत गरज असते. पाणी
    आपल्याला केवळ हायड्रेट ठेवत नाही तर योग्य प्रमाणात ते पिल्याने वजनही घटते. सर्वसामान्यपणे लोक आपले वजन कमी करण्यासाठी रोज तासन्तास जीममध्ये घाम गाळतात. याशिवाय खाण्यावरही नियंत्रण ठेवतात. मात्र, काहीवेळा त्यांच्या पदरी
    निराशाच पडते. तंदुरुस्त शरीरासाठी रोज भरपूर किंवा
    किमान आठ ग्लास पाणी प्या, असा सल्ला दिला जातो. शरीरासाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे आहे; पण ते तितकेच प्यावे जितके आपले शरीर मागते. कोणत्याही
    आरोग्यदायी शरीराला पाण्याची गरज भासताच त्याची माहिती मेंदूला मिळते. त्यावेळी तो शरीराला तहान लागल्याची जाणीव करून देतो. जे लोक दिवसाला किमान आठ ग्लास पाणी पितात, त्यांना कसलेच नुकसान होत नाही. मात्र, एकसारखे पाणी पीत राहिल्याने शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होते.
    सोडियमच्या कमतरतेने मेंदू आणि फुफ्फुसांना सूज
    येण्याची शक्यता असते. मग रोज किती पाणी प्यावे,
    असा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो. यासाठी एक साधे आणि सोपे गणीत तुम्हाला सोडवावे लागेल. जितके तुमच्या शरीराचे वजन आहे त्या आकड्याला ३० ने भागाकार करा. उत्तर येईल तितके लिटर पाणी प्यावयास सुरू करा. उदाहरणार्थ जर तुमचे वजन ६०
    किलो आहे. या आकड्यास ३० ने भागाकार केल्यास त्याचे उत्तर २ येते. तेव्हा ६० किलो वजन असलेल्या व्यक्तीने रोज किमान २ लिटर पाणी पिणे अत्यंत गरजेचे ठरते.

    ReplyDelete