Sunday 31 May 2020

कफ-खोकल्यावर घरगुती उपाय

पावसाळा म्हटलं की भिजणं आलं आणि भिजल्यावर आधी सर्दी व त्यामागून खोकला येतोच. सर्दी दोन दिवसांत बरी होते, पण खोकला बरेच दिवस सतावतो. अशावेळी काही घरगुती उपाय असतात ते पाहुया. गरम दुधात एक चमचा हळद घालून ते दूध प्यावं. हा उपाय सगळ्या वयोगटांसाठी उपयुक्त ठरतो.हळद अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरिअल असते, जी घशातल्या खवखवीशी लढण्यास मदत करते.

Tuesday 26 May 2020

मेथीदाणे सेवनाचे फायदे

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. संपूर्ण भारतात मेथीदाण्यांचे सेवन केले जाते. मेथीदाणे अँनिमिया म्हणजे शरीरात रक्ताची कमतरता असणार्‍या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहेत. मेथीदाण्यामध्ये बहुमूल्य औषधी गुण आहेत. कोलेस्ट्रॉल आणि डायबिटीज रुग्णांसाठी हे अमृतासमान आहेत.

Sunday 24 May 2020

अशी कमी करा चिडचिड

चिंता आणि तणाव आपल्या आरोग्यावर खूप परिणाम करतात. अनेक कारणांमुळे अनेकांना चिडचिडेपणाला
सामोरे जावे लागते. कामाचा व्याप,दगदग, वरिष्ठांची बोलणी अशा अनेक कारणांमुळे चिडचिड वाढते, मात्र हा सगळा राग, चिडचिड ही घरातील सदस्यांवर, कुटुंबावर होते. घरातले म्हणतात, बाहेरची कामे वगैरे बाहेरच आवडून यायचे, घरात आणायचे नाही, पण तसे घडत नाही.

पाणी पिण्याचे नियम आणि फायदे

पाण्याने केवळ तहान भागत नाही तर ते शरीरातून
घातक रसायनदेखील बाहेर काढण्यात मदत करतं.
ज्या प्रकारे अंघोळ केल्याने बाह्य शरीराची सफाई
होते त्याचप्रमाणे पाणी पिण्याने आतल्या शरीराची
सफाई होते.

Saturday 23 May 2020

शांत झोपेसाठी योग संगीत

अनेकदा दिवसभर जास्त श्रम केल्याने किंवा एखाद्या गोष्टीबद्दल मानसिक तणाव असल्यास रात्री शांत झोप लागणे शक्य होत नाही. शरीराला आणि मनाला विश्रांती मिळण्यासाठी शांत, कोणत्याही प्रकारच्या व्यत्ययाशिवाय घेतलेली झोप अतिशय महत्वाची असते. त्यामुळे शांत झोप लागण्यासाठी झोपण्यापूर्वी काही काळ संगीताचा आनंद घेतल्याने निश्‍चित लाभ होईल असे वैज्ञानिकांनी केलेल्या शोधामध्ये निष्पन्न झाले आहे.

Friday 22 May 2020

'तोंड येणे' अशी घ्या काळजी

मला ना सारखं तोंड येतं. मग चांगले पदार्थ खाता येत नाही की, गरम काही पितासुद्धा येत नाही," ही समस्या प्रत्येकाला कधी ना कधी जाणवतेच जाणवते. तोंडाच्या आतील भागात फोड येणे, लाल होणे, काहीही खाताना जिभेची, हिरड्यांची आग होणे, तिखट, खारट आणि आंबट जराही सहन न होणे अशा तक्रारी यात जाणवतात. यात ओठ, जीभ, पडजीभ, घसा, टाळा यांना सूज येते. त्यामुळे आपल्याला काहीही खाता येत नाही आणि नीट गिळतादेखील येत नाही. हे दुखणे फार मोठे नसलं तरी त्याचा त्रास खूप होतो. वारंवार तोंड येण्यावर त्यामुळे वेळीच योग्य ते उपचार घेणे महत्वाचे आहेत.

Wednesday 20 May 2020

असे ठेवा पित्तावर नियंत्रण

पित्त किंवा ऍसिडीटी हे आजकाल अगदी लहान
मुलांपासून ते ज्येष्ठ व्यक्तींपर्यंत कोणालाही होताना दिसतात. खाण्या-पिण्याच्या बदललेल्या सवयी आणि वेळा तसेच मानसिक ताणात होत असलेली वाढ, मसालायुक्त पदार्थ, तेलकट पदार्थांचे सेवन करण्याकडे वाढलेला कल, झोपेच्या बदलेल्या वेळांमुळेही पित्ताचे विकार वाढले आहेत. घरच्या घरी काही उपायांव्दारेही पित्ताचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.

Sunday 17 May 2020

अशी कमी करा पोटाची घेरी

वाढणाऱ्या पोटाची समस्या वा सर्वानाच सतावत असते. आहारावरील नियंत्रण आणि व्यायामाची जोड असेल तर पोटाचा घेर कमी करता येणे शक्य आहे. आरोग्य धावणे, पोहणे, चालणे यांसारख्या जपूया! व्यायाम प्रकाराने शरीरातील उष्मांक कमी करणे शक्य आहे. मात्र वेगाने पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने आणि व्यायामांचे प्रकार केल्यास फरक पडू शकतो. मात्र शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर योग्य आहार असेल तर ही चरबी कमी करता येणे शक्य आहे.

Saturday 16 May 2020

रोजची दिनचर्या आणि रोग प्रतिकारशक्ती

आयुर्वेदातही रोगप्रतिकार शक्ती जास्त असणार्‍या लोकांच्या जवळ काही विकार फिरकतही नाहीत असे म्हटले आहे. आपली रोगप्रतिकार शक्ती जोपर्यंत चांगली असते तोपर्यंत आपण कोणत्याही विकारांचा सामना करण्यास सज्ज असतो. मात्र रोगप्रतिकार शक्ती कमी झाल्यास लहान-लहान आजारही उग्र रूप धारण करतात. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी नुसती औषधे घेणे आवश्यक नाही तर आपली दिनचर्याही योग्य असायला हवी आणि आहारही. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही टिप्स पाहूया.

भारतीय आहाराचे वेगळेपण आणि गुण

आहार हा शरीराला तृप्त करणारा, शीघ्र बल देणारा असतो. आयु (जीवन), तेज (कांती), उत्साह, स्मृती, ओज (जीवनीय शक्ती) आणि अग्नी वाढविणारा आहे. अन्न हे पूर्णब्रह्म आहे असे मानणारी आपली परंपरा आहे. म्हणजेच धान्य, भाज्या साठविण्यापासून तर ते ग्रहण करण्यापयर्ंत अलिखित नियम आजही अनेक घरांमध्ये पाळले जातात. खरेच त्याला महत्त्व आहे का? आहाराचा परिणाम स्वास्थ्यावर कसा आणि किती होतो?

Friday 15 May 2020

अशी घ्या उन्हाळ्यात काळजी

एकीकडे उन्हाने काहिली तर अचानक बरसणाऱ्या पावसाच्या सरी यामुळे वातावरण बिघडले आहे. अशा बदलणाऱ्या वातावरणामुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होत आहेत. उन्हाळ्यात सर्वात जास्त त्रास होतो तो उष्माघाताचा. उन्हामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की, उष्माघात होण्याची शक्यता असते. उष्माघातामुळे शरीरातील  रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. त्यामुळे मेंदूला रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. रक्तातून होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मंदावल्यामुळे रूग्णाला श्वास घेणे कठीण जाते.

Wednesday 13 May 2020

अशी घ्या पोटाची काळजी

बदलत्या जीवनशैलीत पोटाची समस्या सामान्य झाली आहे. कामानिमित्त, सोशल मिडीयामुळे होणारे जागरण, तळलेले, मसालेदार पदार्थ, शारिरीक श्रमांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटाचे  विकार होत असतात. सामान्यतः 90 ते 95 टक्के आजार हे खाण्या-पिण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी, पोटाचे पर्यायाने स्वतःचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

Tuesday 12 May 2020

नृत्य करा, फिट रहा

अनेकांना जीममध्ये जायचा कंटाळा येतो. तिथला व्यायाम वैतागवाणा वाटतो. अशावेळी तुम्ही डान्सिंगचा पर्याय निवडू शकतो. नृत्य हा सुद्धा व्यायामाचा खूप चांगला पर्याय आहे. नृत्याकडे नेहमीच छंद म्हणून बघितलं जातं. पण प्रत्यक्षात फिटनेसच्या दृष्टीने नृत्याचे अनेक लाभ आहेत. नियमित नृत्य केल्याने बर्‍याच कॅलरी खर्च होऊ शकतात. नृत्यप्रकार कोणाताही असला तरी त्याचे तितकेच लाभ होतात. तुम्ही या नृत्याचा आनंद घेणं गरजेचं आहे.

Monday 11 May 2020

अशी घ्या मानेची काळजी

पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी
मानदुखी आज वयाच्या २५ ते ३० वयोगटात येऊन
ठेपली आहे. वाढत्या वयाबरोबरच मान दुखीचा त्रास
टाळायचा असेल तर दैनंदिन हालचालींवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.

Saturday 9 May 2020

अशी घ्या गुडघ्यांची काळजी

मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर जपूया! असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघेदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना आणि उतरताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठून उभे राहात असताना. वेळीच योग्य ती काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने
उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास निश्चीतच कमी होऊ शकतो.

Thursday 7 May 2020

अशी घ्या डोळ्यांची काळजी

दैनंदिन जीवनात सर्वात जास्त वापरले जाणारे इंद्रिय म्हणजे डोळे. प्रत्येक क्षणी कार्यरत राहणाऱ्या डोळ्यांना झोपेपुरतीच विश्रांती मिळते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीचा सर्वाधिक प्रभाव हा डोळ्यांवर पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची  काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. तसेच लॉकडाउन काळात अनेकांचा स्क्रीनटाईम वाढलेला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. त्यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

Wednesday 6 May 2020

.. म्हणून जडतो हृदयविकार

हृदयविकार आणि पक्षाघात या विकारांमुळे भारतात अनेकांचा मृत्यू होतो. अनेक कारणांमुळे आपलं हृदय धोक्यात येतं. हृदयविकाराचा झटका हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होत पूर्णपणे थांबला की हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. यासोबतच हृदयाच्या भित्तीकांशी संबंधित विकार असतात. तसंच हृदयाच्या ठोक्यांची अनियमितताही हृदयविकाराला निमंत्रण देते.

दीर्घ श्वास घ्या... उत्साह...जोम वाढवा!

आपली मानसिक व शारीरिक स्थिती आणि श्वासोच्छवास यांचे  जवळचे नाते असते. शारीरिक व मानसिक स्थितीतल्या बदलांमुळे श्वासोच्यासातही बदल होतो. त्याची गती व खोली वाटते. खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला प्राणवायूची गरज वाढलेली असते. अशा वेळी आपला खोल आणि जलद गतीने श्वासोच्यास सुरू होतो. मोठमोठे उसासे टाकतो.

असा टिकवून ठेवा - ट्रेकिंगसाठीचा फिटनेस!

ट्रेकिंगची आवड अनेकांना असते. हिवाळा आणि पावसाळ्यातही ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते, तर उन्हाळ्यात जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ट्रेकऐवजी जंगल भटकंती, किरले यांवर भ्रमंती केली जाते; मात्र पुढे ट्रेकिंगमध्ये तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा असतो. सध्या लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्य नाही, तरीही ट्रेकिंगमधील फिटनेस तुम्ही घरच्या घरी टिकवून ठेवू शकता.

Tuesday 5 May 2020

वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषां'चा विचार करा आणि जीवन जागा

आयुर्वेदात 'त्रिदोष सिद्धांत' ची विस्तृत व्याख्या दिली आहे. वात, पित्त, कफ हे शरीराचे तीन दोष आहेत. या दोषांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या दोषांनुसार आहाराकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.

अशी घ्या जिभेची काळजी...

 इतर अंगांप्रमाणे जीभ हेसुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तेवढीच जिभेची काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर  लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे ही समस्या अनेकांना उद्भवते. तोंड येण्याचा त्रासही अनेकांना सहन करावा लागतो.

गरिबांचा काजू: शेंगदाणे

शेंगदाण्याला गरिबांचे काजू असे म्हटले जाते. आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असलेल्या शेंगदाण्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. शेंगदाण्याचे तेल आरोग्यासाठी हितकारक ठरते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अनेक अँटी ऑक्सिडंटस उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच याशिवाय अनेक आवश्यक पौष्टिक घटकांचा पुरवठाही केला जातो.

Sunday 3 May 2020

पायांचीही काळजी घ्यायलाच हवी!

दिवसभरात आपले पाय काय काय आणि किती सहन करत असतात. दिवसभर कामात असणाऱ्या पायांना आरामाचीही गरज असते. बदलत्या ऋतुमानानुसार पायांची  काळजी घेणे आवश्यक असते. पावले स्वच्छ,  सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी करता येणे शक्य आहे. हवामानानुसार आपल्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, हिवाळ्यात कोरडी होऊन फुटते आणि पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी लागते.

Saturday 2 May 2020

प्रदूषण देतेय दम्याला निमंत्रण

मे महिन्याचा पहिला मंगळवार जगभरात दमा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा  5 मे म्हणजे हा दिवस साजरा होतोय. फुफ्फुसांचा अतिशय चिवट असा हा आजार आहे. जगभरातील दमेकऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के दमेकरी भारतीय आहेत. हा रोग थोडा अनुवंशिक असला तरी दम्याच्या वाढत्या प्रमाणामागे प्रदूषण हे  मुख्य कारण आहे. श्वसनमार्गात दाह निर्माण  करणारे वातावरणातले विषाणू आणि  अर्थातच अॅलर्जीला कारणीभूत  असणारे घरातील प्रदूषणकारी घटक  दमा होण्यासाठी धोकादायक ठरू  शकतात.