ही काळजी आवर्जून घ्या...
• बाहेरून आल्यानंतर पाय स्वच्छ धुवावेत. व्यवस्थित कोरडे करावेत. दोन बोटांमध्ये पाणी साठून बुरशी वाढू शकते.
• अंघोळीनंतर हात, चेहऱ्याप्रमाणे पायांनाही मॉईश्चरायझर लावल्यास फायदेशीर. त्वचेनुसार आणि हवामानानुसार मॉईश्चरायझर निवडावे.
•शक्यतो कॉटनचे सॉक्स वापरा. पायांची नखे वायू नका.
• पादत्राणांची निवड व्यवस्थित करा, पायांच्या बोटांकडे चिंचोळे असलेले
शूज वापरू नयेत. त्यामुळे नखांवर दाब पडतो. नखे अंगठ्यांच्या मासांमध्ये वाढण्याचा विकार होतो. शूजचे किमान दोन जोड घ्यावेत. एक दिवसाआड ते वापरावेत. सॉक्सप्रमाणे शूज बदलले नाहीत, तर बुटांमध्ये ओलावा राहतो.
*हाय हिल्स घालू नयेत. शक्यतो फ्लॅट चप्पल वापरावी.
•स्टाईल म्हणून हाय हिल्स वापरत असाल तर त्याची उंची २ इंचांपेक्षा जास्त नको. पेन्सील हिल तर वापरूच नयेत.
पॅडीक्युअर करताना नखांच्या बाजूची त्वचा निधू नये याची काळजी घ्यावी.
• तळव्याची त्वचा कडक झाली असेल किंवा भेगा, घट्टे पडले असतील तर दहा मिनिटे पाण्यात पाय सोडून बसावे. स्क्रबरने हलक्या हाताने मृत त्वचा काढावी. अतिप्रमाणात त्वचा कडक झाली असेल तर रात्री झोपताना मलम लावून सॉक्स घालावेत.
• अनवाणी चालू नये. साबणाचे पाणी, धूळ, माती, चिखल आणि रसायनाच्या संपर्कात पाय येऊ देऊ नयेत. आल्यास लगेच पाय स्वच्छ धुवावेत.
• ज्यांना मधुमेह आहे, त्यांनी विशेष काळजी घ्यावी. रोज झोपताना आपल्या हाता-पायांना जखम झाली आहे का, हे तपासावे.
हे व्यायाम करा...
• तळव्यांचा व्यायामही गरजेचा आहे.
• टीव्ही पाहताना टेनिस बॉल पायाच्या तळव्यांनी रोल करा.
•बोटांमध्ये चिखल्या होऊ नयेत, यासाठी रात्री झोपताना बोटांमध्ये कॉटनचे बॉल ठेवावेत.
बदलत्या हवामानाचा परिणाम थेट त्वचेवर होतो.
त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी. पायांच्या स्वच्छतेसाठी धुण्याबरोबरच ते व्यवस्थित कोरडेही करावेत. जेणेकरून बुरशी होणार नाही.
No comments:
Post a Comment