आयुर्वेदात 'त्रिदोष सिद्धांत' ची विस्तृत व्याख्या दिली आहे. वात, पित्त, कफ हे शरीराचे तीन दोष आहेत. या दोषांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या दोषांनुसार आहाराकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.
त्यानुसार, डॉक्टर या गोष्टी न टाळण्याचा सल्ला देखील देतात. वात, पित्त, कफ यांच्या दोन अवस्था असतात. समावस्था आणि विषमावस्था. समावस्था ( ना कमी, ना अधिक, संतुलित, नैसर्गिक, स्वाभाविक) आणि विषमावस्था (हीन, अति, दूषित, बिघडलेले, असंतुलित , विकृत) रोगांचे कारण वात, पित्त आणि कफ यांचे असंतुलन आहे. अस्वस्थ शरीर पुन्हा स्वस्थ बनवण्यासाठी 'त्रिदोष' मध्ये संतुलन किंवा समावस्थामध्ये आणण्याची गरज पडते.
काय आहे शरीरामध्ये दोष
पहिल्यांदा एक गोष्ट जाणून घेतली पाहिजे की रुग्णावर कोणत्या दोषाचा प्रभाव आहे. रुग्णाची प्रकृती कोणत्या प्रकारची आहे. वात (बादी), पित्त (गरम), कफ (थंड) प्रकृती आहे. दोष लक्षात घेऊन आहार ठरवण्याची गरज आहे. जसे की कफवृद्धी असेल तर त्याने कफवर्धक आहारापासून स्वतः ला वाचवले पाहिजे. अशा वेळेला कफ शामक आहार घेतला पाहिजे.
तीन कारणांमुळे वाढतो वात
वात बिघडण्याची तीन कारणे आहेत. आहार, जीवन शैली आणि मानसिक भाव. आहारात चना, मूग डाळ आणि डाळी ( उडीद सोडून) ,कारले, पडवळ, भोपळा, तोरई (भोपळा प्रकार) याने वात वाढतो. बाजरी, ज्वारी ,चना यांच्यापासून बनलेले पदार्थ आणि शिळे अन्न खाल्ल्याने वात वाढतो. रात्री उशिरापर्यंत जागणे, अधिक कसरत करणे, कमी जेवणे, उलट्या आणि अतिसारने वात वाढतो.रात्री झोप कमी घेणे आणि चिंता अधिक केल्यानेही वात वाढतो.
हे आहेत वातशामक
वातशामक म्हणजे यांमुळे वायू दोष नाहीसा होतो. यासाठी आहार, जीवनशैली यांकडे लक्ष द्यायला हवे. आनंदी राहा. आहारात दूध, (पनीर, मावा, मिठाई) व त्यांपासून बनलेले पदार्थ , तूप, गूळ, साखर, मांसाहार, लसूण, कांदा, हिंग, अजवाईन, सरसों आणि तिळाचे तेल यांच्या सेवनाने वाट कमी होतो. नियमित आठ तास झोप, दुपारी झोपणे, अधिक थकवा येणारा व्यायाम न करणे आरामदायी खुर्चीवर बसणं याने वात परिस्थिती घटते. चिंता आणि तणाव यांपासून स्वतः ला दूर ठेवा. पाणी योग्य प्रमाणात पिणे. सॅलेड (सलाद) आणि मोसमी फळे खाणे.
कफ वर्धकची तीन कारक
आहारात दूध (पनीर, मावा, मिठाई) आणि त्यापासून बनवलेले पदार्थ , गूळ, साखर , आइस्क्रीम, मांसाहार याने कफ वाढतो. जीवनशैली चा विचार केला तर अधिक झोप घेणे (सात आठ तासांपेक्षा अधिक झोप) , दुपारी झोपणे, व्यायाम ना करणे एसी मध्ये अधिक काळ व्यतीत करणे, पूर्ण दिवस आराम खुर्चीत बसून घालवणे यांमुळे कफ वाढतो. मानसिक स्थितीचा विचार करता कमी चिंता करणाऱ्या आणि आनंदी राहणाऱ्या लोकांमध्ये नैसर्गिकरित्या कफ वाढतो.
कफशामक आहार
चना, मूग डाळ व अन्य डाळी ( उडीद डाळ सोडून) कारले, लसूण, कांदा, तोरई (भोपळा) ,गरम मसाले, सारसों आणि सरकी तेल कफ दोष बरे करतात. रात्री उशिरापर्यंत जागणे, व्यायाम करणे,गरम पाणी पिणे आणि चिंतन केल्याने कफ कमी होतो.
हे वाढवतात पित्त
वांगे, सारसों का साग, हळद, लसूण, लोणचे प्रमुख पित्तवर्धक आहेत. अधिक व्यायाम करणे, उन्हात अधिक काळ बसणे, आगीजवळ जास्तवेळ बसणे, उष्णता निर्माण करणाऱ्या मशिनीजवळ बसणे आणि चिडचिड व अधिक क्रोध करणे यामुळे पित्त वाढते.
हे आहेत पित्तशामक
पित्त शामकच्या रुपात आहारानुसार दूध आणि त्यापासून बनणारे पदार्थ, भात, मिठाई, थंड पाणी, केळी, सफरचंद, डाळींब, द्राक्षे, आवळा, भोपळा, कारले, मेथी, पडवळ आणि हिरव्या पालेभाज्या प्रमुख आहेत. जीवनशैली नुसार थंड खोलीत बसणे, पाण्याचा फवारा, नदी किंवा समुद्र काठी बसणे, मोती, हिरे व अन्य रत्नांचे हार किंवा अंगठी घालणे, सुगंधी फुलांचा गजरा घालणे आणि चांदण्या रात्री बसल्याने पित्त कमी होण्यास मदत होते. मानसिक भावानुसार आनंदी राहिल्याने पित्त कमी होते.
(पत्रिका सेहत फेब्रुवारी 2019 अनुवाद)
No comments:
Post a Comment