Sunday 17 May 2020

अशी कमी करा पोटाची घेरी

वाढणाऱ्या पोटाची समस्या वा सर्वानाच सतावत असते. आहारावरील नियंत्रण आणि व्यायामाची जोड असेल तर पोटाचा घेर कमी करता येणे शक्य आहे. आरोग्य धावणे, पोहणे, चालणे यांसारख्या जपूया! व्यायाम प्रकाराने शरीरातील उष्मांक कमी करणे शक्य आहे. मात्र वेगाने पोटाचा घेर कमी करण्यासाठी योगासने आणि व्यायामांचे प्रकार केल्यास फरक पडू शकतो. मात्र शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी केवळ व्यायाम पुरेसा नाही, तर योग्य आहार असेल तर ही चरबी कमी करता येणे शक्य आहे.

हे आवर्जून करा
• चालणे, पोहणे, सायकलिंग असा व्यायाम दररोज खंड न पाडता एक तास केल्यास अतिरिक्त चरबी कमी होण्यास मदत होते.
• यामध्ये वॉर्म अप करताना पहिले पाच मिनीटे हळू चाला. त्यानंतर कमीत कमी 45 मिनीटे जलदगतीने चाला. शेवटी पुन्हा पाच मिनीटे हळू चाला.
• जर आपल्याला एक किंवा दोनदा भरपूर जेवायची सवय असेल तर ही सवय सोडा, आहार तीन ते चार भागांमध्ये वाटून घ्या. प्रत्येकवेळी पोटभर न जेवता थोड्या प्रमाणात खा.
* पहाटे रिकाम्या पोटी गरम पाणी पिणे फायदेशीर ठरेल. याने कॅलरीज कमी होतील. तसेच गरम पाण्यात लिंबू आणि मध घालून प्यायल्यानेही चांगले परिणाम मिळतात.
• रात्री उशिरा जेवणे टाळा. रात्री झोपण्याआधी दोन तास आधी जेवावे किंवा रात्री हलका आहार घ्यावा.
• झोपण्याआधी शतपावली केल्यास फायदेशीर ठरते.
* चौरस आहार- व्यायामाची सुरवात केल्यानंतर चमचमीत, मैदायुक्त, अतिसाखर असलेले पदार्थ आहारात घेऊ नये. चौरस आहारात फॅट वाढवणारे पदार्थ कमी आणि प्रोटीन देणारे पदार्थ वाढवा.
व्यायाम करताना सातत्य ठेवा. आठवड्यातील चार
दिवस व्यायाम आणि इतर दिवशी कंटाळा करणे असे
करू नका. दररोज ठराविक कालावधी चालणे, पोहणे,
सायकलिंग, जॉगिंग असा व्यायाम करा, ज्या व्यायामातून पूर्ण श्वास घेता येतो, असे व्यायाम प्रकार करा,

No comments:

Post a Comment