Tuesday 5 May 2020

गरिबांचा काजू: शेंगदाणे

शेंगदाण्याला गरिबांचे काजू असे म्हटले जाते. आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असलेल्या शेंगदाण्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. शेंगदाण्याचे तेल आरोग्यासाठी हितकारक ठरते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अनेक अँटी ऑक्सिडंटस उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच याशिवाय अनेक आवश्यक पौष्टिक घटकांचा पुरवठाही केला जातो.
व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन ई ६, व्हिटॅमिन ई ९, पेंटॉथॅनिक अँसिड, नियाचिन, रिबोफ्लोवीन, थियामिन असे अनेक पौष्टिक घटक शेंगदाण्याद्वारे शरीराला पुरविले जातात. शेंगदाण्यामुळे शरीरातील घातक कोलेस्टरॉलची पातळी कमी होण्यास मदत होते. चांगल्या कोलेस्टरॉलची पातळी वाढण्यास मदत होते. शेंगदाण्याताली अनसॅच्युरेटेड फॅटी अँसिडमुळे हृदय रोगावर उपचार करणे सुलभ होऊन जाते. शेंगदाण्यामुळे शरीराला प्रोटिन्सचा भरपूर पुरवठा होतो. शेंगदाण्यातील अँमिनो अँसिडमुळे शरीराची सर्वांगीण वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे लहान मुलांना शेंगदाणे आहारातून दिलेच पाहिजेत. शेंगदाण्यामध्ये पॉलिफेनोलिक नावाचे अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे कर्करोगासारख्या व्याधीला प्रतिबंध होतो.
शेंगदाण्यातील अँटी ऑक्सिडंटच्या मोठय़ा प्रमाणामुळे शरीराची अंतर्गत सफाई जोमाने होते. शेंगदाणे उकडल्यावर त्यातील अँटी ऑक्सिडंटसचे प्रमाण आणखी वाढते. बदामाप्रमाणे शेंगदाण्यात व्हिटॅमिन चे प्रमाणही भरपूर आहे. त्यामुळे आपली त्वचा चांगली राहण्यासाठी तसेच केस दाट राहण्यासाठी शेंगदाण्याचा उपयोग होतो. काजूमध्ये शरीराला उपयोगी पडणारे जे घटक आहेत, तेच घटक शेंगदाण्यामध्येही आहेत. म्हणून शेंगदाण्यांना गरिबांचे काजू असे म्हटले जाते. पोटॅशियम, मेंगेनीज, कॉपर, कॅल्शियम, आयर्न, सेलिनियम, झिंक यासारखे शरीराच्या सर्वांगीण वाढीला आवश्यक असणारे मिनरल्स शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात सापडतात. ज्या महिला आठवड्यातून दोन वेळे शेंगदाणे खातात त्यांचे वजन वाढण्याची शक्यता कमी होते, असेही वैद्यकीय संशोधनातून दिसून आले आहे. गर्भारपणात आणि बाळंत झाल्यानंतर महिलांनी शेंगदाणे खाल्ल्यास ते मूल शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त राहाते, असेही दिसले आहे. शेंगदाण्यामधील मॅग्नेशियममुळे कॅल्शियम, फॅटसआणि काबोर्हायड्रेटस शरीरामध्ये विरघळून जाण्यास मदत होते. त्यामुळे रक्त शर्करेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. शेंगदाण्यामुळे त्वचेच्या एक्झीमा आणि सोरायसिससारख्या व्याधींवर उपचार करता येणे शक्य आहे.
शेंगदाण्यातील फॅटी अँसिडमुळे शरीरावर सूज येणे, त्वचा लाल होणे यासारख्या आजारांवर उपचार करता येणे शक्य होते असेही दिसून आले आहे. शेंगदाण्यातील व्हिटॅमिन ए, झिंक आणि मॅग्नेशियमच्या प्रमाणामुळे त्वचा तजेलदार आणि चमकदार राहण्यास मदत होते. त्याचबरोबर बॅक्टेरियापासून त्वचेचा बचाव करणेही शक्य होते. ज्यांना आपल्या चेहर्‍यावर आणि शरीरावर वाढत्या वयाच्या खूणा दिसू नयेत असे वाटत असते अशांकरिता शेंगदाणे अत्यंत उपयुक्त आहेत. कोणत्याही हंगामात शेंगदाणे खाता येतात. वर्षभर शेंगदाणे बाजारात उपलब्ध असतात.

No comments:

Post a Comment