Wednesday 29 April 2020

उत्तम आवाजासाठी जपा घशाला...

घसा हा अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील महत्त्वाचा अवयव आहेच. त्यासोबतच आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो, ते स्वरयंत्र घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते, तसेच त्याच्या किरकोळ तक्रारीवरही त्वरित उपचार करणे आवश्यक असते. खोकला, सर्दी झाल्यास आवाज बदलतो. अनेकदा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते. गायनाचा छंद असलेल्यांना तर घशाची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.
हे आवर्जून करा...
• उन्हाळ्याच्या दिवसांत घसा कोरडा पडतो. त्याचा परिणाम स्वरयंत्रावरही होतो. त्यामुळे दिवसातून प्रकृतीनुसार कमीत कमी तीन ते चार लिटर पाणी प्यावे. रोज कोमट पाणी आणि मिठाच्या गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा स्वच्छ होतो.
• अनेकांना बोलताना खाकरण्याची सवय असते. त्याचाही दुष्परिणाम स्वरयंत्रावर होत असतो. त्यामुळे ती सवय मोडावी.
• धुळीच्या संपर्कात जाऊ नये. धुळीमध्ये काम करावे लागल्यास तोंडाला मास्क वापरावा.
• सर्दी होऊ न देण्यासाठी काळजी घ्यावी.
• काहीजणांना खूप बोलण्याची सवय असते. जास्त बोलण्याने स्वरयंत्रावर ताण येतो. त्यामुळे जास्त बोलणे टाळावे.
• आहार संतुलित आणि वेळेवर घ्यावा. झोपही पुरेशी घ्यावी. आहारासाठी...
• तेलकट, तिखट आणि अतिथंड पदार्थ कमी प्रमाणात घ्यावेत.
• लवंग, ज्येष्ठमध नियमित घ्यावे. त्यामुळे घसा ओला राहतो. आवाजही सामान्य राहतो.
उन्हाळ्याच्या दिवसांत घसा कोरडा होतो. त्याचा परिणाम स्वरयंत्रावर होत असल्याने, घसा ओला ठेवण्यासाठी तीन ते चार लिटर पाणी थोड्या थोड्या वेळाने पित राहावे. तसेच स्वरयंत्रावर ताण येऊ नये, याचीदेखील काळजी घ्यावी.
(सौजन्य-सकाळ)

No comments:

Post a Comment