Tuesday 7 July 2020

जायफळाचे सेवन करण्याचे फायदे

अनेक विकारांवर केल्या जाणार्‍या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाणही मुबलक आहे. त्यामुळे याच्या उपयोगाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आयुर्वेदानुसार जायफळ अनेक विकारांवर गुणकारी आहे. अपचन, गॅसेसमुळे पोट फुगल्यास किंवा पचनासंबंधी इतर तक्रारी असल्यास दोन मोठे चमचे जायफळाची पूड आणि पाव चमचा सुंठ पूड एकत्र करावे. भोजन करण्याच्या अर्धा तास आधी या मिर्शणातील १/८ चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करावी. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास वारंवार होत असेल त्यांनी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन वेलदोडे, पाव चमचा सुंठ पूड आणि एक चिमुटभर जायफळाची पूड घालून हे मिर्शण चांगले उकळावे आणि या काढय़ाचे सेवन करावे.

जेवताना मांडी घालून बसण्याचे फायदे

जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. जमिनीवर ताट ठेवून जेवताना अन्नाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या होणार्‍ा शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंवर दाब पडतो. त्यामुळे पचनाची क्रिया सुधारते. जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. त्यामुळे मेंदू शांत होतो. यामुळे अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते आणि वजनही काबूत राहते. पद्मासनात जेवायला बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.