Saturday, 9 May 2020

अशी घ्या गुडघ्यांची काळजी

मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर जपूया! असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघेदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना आणि उतरताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठून उभे राहात असताना. वेळीच योग्य ती काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने
उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास निश्चीतच कमी होऊ शकतो.

गुडघेदुखीची कारणे...
स्थूलतेचे वाढणारे प्रमाण, गुडघ्यावर अतिभार टाकणाऱ्या क्रिया.
* वयोमानानुसार होणारी हाडांची झीज.
* पूर्ण दिवस उभे राहून काम करण्याच्या सवयीमुळे गुडघ्यांच्या हालचालींना न मिळणारा वाव.
• चुकीची व्यायाम पद्धत, वजन वाहून नेण्याचे काम.
हे आवर्जून करा...
• उंच टाचांच्या चपला वापरणे टाळा.
* चालताना काठीचा वापर करा. त्यामुळे काही भार गुडघ्याएवजी काठीवर निभावला जाईल.
* वजन नियंत्रित ठेवा.
* गुडघेदुखीवर व्यायाम हा उत्तम उपाय आहे. व्यायामामुळे स्नायू अधिक बळकट होतात. सांधे लवचिक होतात.
• गुडघ्यांचे व्यायाम हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करावेत.
गुडघेदुखीसाठी भार रहित व्यायाम करावेत. जसे की खुर्चीवर बसून पाय  सरळ वर खाली करणे. हे दिवसातून चार-पाच वेळा करावे.
* व्यायामामुळे गुडघ्याभोवतालच्या स्नायूंना बळकटी येते.
आहारात हे करा...
• आहारात कॅल्शियम आणि ड जीवनसत्वाचे प्रमाण योग्य असणे आवश्यक आहे.
* दूध-दह्याचे योग्य प्रमाणात सेवन करा. सोयाबीनचे पदार्थ खा. आहारात अंड्याचा समावेश करा.
* गुडघेदुखी टाळण्यासाठी मॉर्निग वॉकला जाणे फायदेशीर. परंतू सध्या लॉकडाऊनमुळे घराबाहेर जाता येणे शक्य नाही. त्यामुळे घरच्या घरी जमतील तेवढे व्यायाम करा. सपाट पृष्ठभागावर चाला. वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.

No comments:

Post a Comment