Wednesday 6 May 2020

दीर्घ श्वास घ्या... उत्साह...जोम वाढवा!

आपली मानसिक व शारीरिक स्थिती आणि श्वासोच्छवास यांचे  जवळचे नाते असते. शारीरिक व मानसिक स्थितीतल्या बदलांमुळे श्वासोच्यासातही बदल होतो. त्याची गती व खोली वाटते. खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला प्राणवायूची गरज वाढलेली असते. अशा वेळी आपला खोल आणि जलद गतीने श्वासोच्यास सुरू होतो. मोठमोठे उसासे टाकतो.
म्हगजेच मनातल्या भावनांचा आणि  शारीरिक कष्टांचा श्वसनावर परिणाम होतो. याउलट खोल व दीर्घ श्वसनामुळे शरीरातील जोग वाढतो, उत्साहासोबतच कार्यक्रमताही वाटते.
हे आवर्जून करावे...
* मानसिक व शारीरिक स्वास्थ्य मिळाल्याच्या दृष्टीने प्राणायाम उपयोगी मात्र तो तज्ज्ञ किंवा योगतज्ञांकडून व्यवस्थित शिकून घ्यावा.
* हृदय रुग्णांच्या दृष्टीने प्राणायाम फार महत्वाचा आहे.
* दीर्घ श्वसनामध्ये दीर्घ श्वास घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा असतो. श्वास येताना जितका वेळ लागला असेल, त्यापेक्षा जास्त वेळ तो बाहेर टाकायला घ्यावा. या श्वसनाने प्राणवायूची देवाणघेवाण व्यवस्थित व्हायला मदत होते. स्वासोच्वासावर लक्ष केंद्रीत करावे. शरीरात अखंड लपोत चाललेली हालचाल म्हणजे आपला श्वासोच्छवास,
• डोळे मिटून स्वस्थ बसावे. आपल्या श्वासोच्छवासावर लक्ष केंद्रीत करावे. प्रत्येक श्वास कसा घेतो व सोडतो ते जाणीवपूर्वक अनुभवावे.
* हृदयविकार व रक्तदाब आजार कमी प्रमाणात होतात. प्राणायम, दोर्ष श्वसन, अनुलोम-विलोम, भ्रामरी, कपालभाती या सर्व श्वसनाच्या व्यायामाचे आरोग्यावर चांगले परिणाम होतात. मानसिक तणाव कमी होतो.
•एरोबिक्स व्यायाम आणि फुगा फुगविग्यानेही श्वसनाच्या आजारापासून आराम मिळतो.
* जागेवरच निस्क वॉक व स्लो रनिंगही फायद्याचे ठरते.
श्वसनाचे आजार टाळण्यासाठी हे करा...
• गरम व गार असे एकावर एक पदार्थ पिणे टाळा. अती गार पदार्थाचे सेवन टाळा.
• धूम्रपान करणे, तंबाखू खाणे हे प्रकार टाळा. कोरोना, स्वाईन फ्ल्यू हे श्वसनाचे आजार आहेत. ते टाळण्यासाठी श्वास यंत्रणा तंदुरुस्त असणे गरजेचे आहे.
घरच्या घरी सोप्या व्यायामातूनही हे आजार आपण टाळू शकतो. सर्दी झाल्यास घाबरून न जाता दिवसातून तीन वेळा वाफारा घ्यावा. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधे घ्यावीत.
( दै. सकाळ)

No comments:

Post a Comment