Wednesday 13 May 2020

अशी घ्या पोटाची काळजी

बदलत्या जीवनशैलीत पोटाची समस्या सामान्य झाली आहे. कामानिमित्त, सोशल मिडीयामुळे होणारे जागरण, तळलेले, मसालेदार पदार्थ, शारिरीक श्रमांचा अभाव यांसारख्या अनेक कारणांमुळे पोटाचे  विकार होत असतात. सामान्यतः 90 ते 95 टक्के आजार हे खाण्या-पिण्याशी संबंधित आहेत. त्यामुळे पचनशक्ती व्यवस्थित ठेवण्यासाठी, पोटाचे पर्यायाने स्वतःचे आरोग्य सदृढ ठेवण्यासाठी दैनंदिन जीवनात काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे.

हे आवर्जून करा...
• अन्न पचनासाठी पोटात तयार होणारे आम्ल म्हणजेच ऍसीड महत्वाचे कार्य करते. मात्र काही वेळेस या ऍसिडचे प्रमाण अधिक होते. त्यामुळे ऍसिडीटीची समस्या उद्भवते.
• तेलकट, मसालेदार पदार्थ हे ऍसिडीटीचे प्रमुख कारण आहे.
• ऍसिडीटी कमी करण्यासाठी सकाळी उठल्यावर लगेचच कोमट पाणी प्या.
* जेवल्यानंतर साधारण तास-दीड तासाने भरपूर पाणी प्या.
• हलका आणि सात्विक आहार घेण्यास प्राधान्य द्या.
• बाहेरचे खाणे, फास्ट फूड, जंक फूड टाळा.
• तिखट, तेलकट पदार्थ टाळा. जेवणाच्या वेळा पाळा.
• पुरेशी विश्रांती घ्या. सात ते आठ तासांची झोप आवश्यक आहे.
• जास्त तिखट पदार्थ खाल्ल्याने पोटातील दाह वाढतो. सतत तिखट खाल्ल्याने नकळत पोटात सूज येते.
•जेवताना किंवा काहीही खाताना अन्न व्यवस्थित चावून खा. गडबडीत जेवल्याने तोंडातील लाळ अन्नात कमी प्रमाणात मिसळते. अल्कीन व ऍसीडचे प्रमाण व्यवस्थित असेल तरच पचन व्यवस्थित होते.
• दिवसांतून चार ते पाच लीटर पाणी प्यावे. पचनक्रिया चांगली आणि पोट साफ होण्यासाठी पाण्याचे प्रमाण योग्य हवे.
• आहारात पिष्टमय पदार्थ, प्रथिने, कॅल्शियम असलेल्या पदार्थांचा समावेश करावा.
• हिरव्या पालेभाज्या, फळे मोठ्या प्रमाणात घ्या. लिंबू, संत्री यांच्यासारख्या क जीवनसत्व मिळणारी फळे खा.
* चहा, कॉफीचे प्रमाण नियंत्रित ठेवा.
* बहुतेक आजार हे खाण्यापिण्याच्या सवयीतून होतात. त्यामुळेवेळच्या वेळी, पौष्टिक आहार घ्यावेत. पाणी भरपूर प्यावे.
* हंगामानुसार मिळणारी फळे खा.

No comments:

Post a Comment