जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. जमिनीवर ताट ठेवून जेवताना अन्नाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या होणार्ा शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंवर दाब पडतो. त्यामुळे पचनाची क्रिया सुधारते. जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. त्यामुळे मेंदू शांत होतो. यामुळे अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते आणि वजनही काबूत राहते. पद्मासनात जेवायला बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
आहारतज्ञांच्या सल्ल्यानुसार, जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो आणि त्यामुळे अन्नाचा स्वाद, स्वरूप, चव यावर लक्ष केंद्रित होते. त्यामुळे मनाची अस्थिरता कमी होते. वाढत्या वजनावर नियंत्रण मिळवता येते.
जमिनीवर मांडी घालून बसलेली व्यक्ती जर कशाचाही आधार न घेता उठली तर तिचे आयुष्यमान जास्त आहे, असे तज्ज्ञ सांगतात. कारण जमिनीवर बसून उठण्यासाठी शरीर लवचिक असावे लागते. मांडी घालून किंवा पद्मासनात बसल्याने नसांमधील थकवा कमी होतो. त्यामुळे मन, मेंदू आणि शरीरातील त्रास कमी होतात.
कधी कधी जेवणानंतर शरीर गरम होते किंवा घाम येतो. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी शरीराला ऊर्जेची गरज असते. खुर्चीवर बसण्याऐवजी जमिनीवर बसून जेवल्याने शरीरातील रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे पचनही सुधारते. पद्मासन किंवा मांडी घालून बसल्याने सांधेदुखी, गुडघा, घोटा, कमरेतील स्नायुदुखी दूर होते. यामुळे शरीर निरोगी राहते.
No comments:
Post a Comment