Saturday, 2 November 2019

बहुगुणी केळी

आपल्या आरोग्यासाठी सर्वच प्रकारची फळे चांगली असतात. विविध फळांतून विविध आवश्यक घटक मिळतात. फळांमध्ये केळी अधिक लोकप्रिय आहेत. साधारणपणे वर्षभर केळी बाजारात मिळतात. शिवाय इतर फळांच्या तुलनेत केळी स्वस्तही असतात. केळीचे फायदे जाणून घेऊयात,
*केळी हे बहुगुणी फळ आहे. केळीचे आरोग्याला अनेक फायदे आहेत. त्यामध्ये अनेक पोषक घटक आणि जीवनसत्त्वे आहेत. केळीमध्ये अ, ब, क ही जीवनसत्त्वे आणि झिंक, पोटॅशिअम, लोह ही खनिजेही असतात.
* सध्या उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत आहे. रक्तदाबाच्या रुग्णांना मीठ घातक असते. केळीमध्ये अतिशय कमी प्रमाणात मीठ असते. मात्र, त्यात पोटॅशिअमचे प्रमाण अधिक असते. पोटॅशिअममुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. आपल्या शरीरातील सर्व प्रक्रिया नियंत्रित होतात. श्वसन संस्था चांगली राहते. *हृदयाचे तसेच मेंदूच्या विविध भागांतील चेतापेशींचे कार्यही सरळीत राहते.
*केळीमध्ये तंतूही भरपूर प्रमाणात असतात. ते हृदयासाठी अत्यंत लाभदायक मानले जातात. केळीमधील तंतुमय पदार्थहृदयविकारांपासून आपले रक्षण करतात.
* केळी पचनशक्ती वाढविण्यासाठीही चांगले असते. नियमित केळी खाल्ल्यास पचनशक्ती वाढण्यास मदत मिळते. त्यामुळे मूळव्याधीसारख्या आजारापासूनही
बचाव होतो.
* सध्या अनेक महिलांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण वाढत आहे. यात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. शरीरातील लालरक्त पेशीही कमी होतात. केळीमुळे रक्तक्षयासारख्या आजारापासून बचाव होतो.

No comments:

Post a Comment