अलिकडे बरेचजण आपल्या शरीराकडे काळजीने
पाहायला लागले आहेत. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी
विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यात फिटनेस अॅप्सदेखील मागे नाहीत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचम
आहे, वजन वाढवायचं आहे. धावायचं आहे किंवा
पोहायचं आहे. त्याचबरोबर रोज चालायचं आहे. यासाठी मार्गदर्शन कारणारे अॅप्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध
झाले आहेत. त्यातल्या काही फिटनेस अॅप्सची
ओळख करून देत आहे. या अॅप्सच्या माध्यमातून
तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. पाहूया काही फिटनेस
अॅप्स...
8fit
8फिट वर्क आऊट आणि जेवण्याचे प्लॅनिंग
एकदमच तुम्हाला माहिती देतो. तुम्हाला जे परिणाम हवे असतात,
ते लक्षात घेऊन अॅप डाइट आणि एक्सरसाइजसाठी पर्सनलाइज्ड
प्रोग्राम तयार करण्यात आला आहे.हा अॅप
अशा लोकांसाठी आहे, खूप काही मार्गदस्रहक, उपाय, रिमाइंडर आणि इंडस्ट्रक्शनन्स पसंद करतात.
fit
Radio
फिट रेडिओ हे एक म्युझिक स्ट्रिमिंग
अॅप आहे, जे गाइडेड वर्क आऊटसाठी
प्लेलिस्टही ऑफर करतो. डीजेच्या निवडलेल्या म्युझिकवर वर्क आऊट
करायचं असेल उपयोगाला येते. वजन उचलण्यासाठी कानाला प्रेरित करणारा
आवाज ऐकायचा असेल फिट रेडिओवर अनेक पर्याय उपलब्ध आहेत.
Map My
Fitness
जे लोक फिटनेसच्या फिल्डमध्ये नवखे आहेत, त्यांच्यासाठी मॅप माय फिटनेस बेस्ट एक्सरसाइज ट्रॅकिंग
अॅप आहे. हे प्रत्येक अॅक्टिविटी रिकॉर्ड करते.
,Charity Miles
डिस्टेन्स रनिंग, वॉकिंग किंवा सायकलिंग करताना हे अॅप कामात आणता येऊ शकते. हे पसंदीच्या संस्थांना चॅरिटी
करते. ज्यावेळेला तुम्ही एक किलोमीटरची दौड पूर्ण करता त्यावेळेला
कॉर्पोरेट स्पॉन्सर्स धनराशी दान करतात. मोबदल्यात त्यांची ब्रांडिंग
दाखवली जाते.
Fitbit
Coach
तुमच्याजवळ फिटबिट ट्रॅकर असेल किंवा
नसेल ,पण तुम्ही फिटबिट कोच अॅप वर्क
आऊट व्हिडिओसोबत फॉलो करण्यासाठी उपयोगाला आणू शकता. यात काही
पर्याय आहेत. तुम्ही स्ट्रेचिंग रुटीन्सपासून स्टेयर वर्क आऊटपर्यंत
करू शकता.
J&J Official 7 minute Workout
के सर्किट वर्क आऊट अॅप आहे. हे अॅप तुम्हाला तुमच्या दैनिक जीवनात उपयोगी एक्सरसाइजशी जोडून देते. याच्या माध्यमातून तुम्ही खुर्चीवर बसून फक्त सात मिनिटे व्यायाम करू शकता.
Blogilates
जर तुम्हाला तंदुरुस्त राहायचे असेल
तर हे अॅप ब्लॉग आणि युट्युब चॅनेल तुमच्यासाठी आहे. हे खूप काही ऑन-डिमांड वर्क आऊट ऑफर करते. याशिवाय तुम्हाला रेसिपिज, फिटनेस रिकमंडेशन्स आणि बॉडी
पॉजिटिविटीचे हेल्दी डोज मिळतात. इथे खासकरून महिलांसाठी कंटेंट
मिळतात.
No comments:
Post a Comment