मित्रांनो, आजकाल ऐन तारुण्यात केस गळतीच्या समस्येत वाढ दिसून येत आहे. ही चिंतेची बाब ठरते. खरं तर केस गळणं ही समस्या वाटते तितकी साधी नाही. यामागे बरीच कारणं असू शकतात. परंतु काही घरगुती उपायांनी केस गळण्याचं प्रमाण कमी करता येईल.
* बीटमध्ये बरेच पोषक घटक असतात. बीटचा रस प्यायल्यामुळे बरेच लाभ होऊ शकतात. बीट फक्त केसांसाठी नाही तर सर्वांगिण आरोग्यासाठी चांगला असतो. आठवड्यातून तीन वेळा बीटचा रस प्या.
* केसांचा नियमित मसाज करून घ्या. मसाजमुळे केसांची मुळं बळकट होतात. इतकंच नाही तर केस दाटही होतात.
* भृंगराजमुळे केसांना बळकटी मिळते. त्यामुळे भृंगराजयुक्त केश तेलाचा वापर करा. या तेलाने मसाज करा. यामुळे केसांची चांगली वाढ होईल.
* केसांचा दर्जा सुधारण्यासाठी दोन अंडी फेटून त्यात चमचाभर दही घाला. हे मिश्रण केसांना लावा. २0 मिनिटांनी धुवून टाका. आठवड्यातून एकदा हा उपाय करा.
* मुलं रोज केस धुतात. पण हा मोह टाळा. केस गळत असतील तर आठवड्यातून दोन वेळा केस धुवा. सौम्य शँपूचा वापर करा. तुमचा शँपू तसंच कंडिशनरमध्ये पॅराबेन आणि सल्फेट असे घटक असणार नाहीत याची खात्री करा.
No comments:
Post a Comment