Thursday, 23 January 2020

आले खाण्याचे फायदे

खूप थंडी आहे, हुडहुडी भरलीये.. चल जरा आलं घातलेला मस्त गरमागरम चहा पिऊ.. थंडी म्हटलं की आलं घातलेला चहा आलाच.. असा आल्याचा चहा प्यायलाने शरीराला थोडी गरमी मिळते..फक्त शरीर गरम राहावं म्हणून नाही तर थंडीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि अशा अनेक समस्या दूर करण्याचे गुणधर्म आल्यामध्ये आहेत. त्यामुळे फक्त चहातूनच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारे आल्याचं सेवन करा आणि थंडीतील आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवा. थंडीमध्ये आल्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊ या.

थंडीत वातावरण बदलामुळे अनेकांना खोकला होतोच. असा खोकला दूर करण्यासाठी आल्याचा रस आणि मध समप्रमाणात घ्यावं.
थंडीमुळे डोकं जड झाल्यासारखं वाटल्यास, डोकं दुखत असल्यास आल्याचा रस डोक्यावर चोळावा.
थंडीमध्ये सांधेदुखीची समस्या तीव्र होते, अशा वेळी आल्याचा रस मीठ घालून चोळावा. शरीरात कुठेही वात आला तर आल्याचा रस हिंग घालून चोळावा.
शरीर थंडगार पडत असल्यास आलं आणि लसणीचा रस एकत्र करून शरीरावर चोळावा.
जेवायला बसण्यापूर्वी मीठ लावून आलं खाल्ल्यास अग्नी वाढतो, तोंडाला रूची येते, जिभेचा बुळबुळीतपणा नाहीसा होऊन घसा साफ होतो.
श्‍वास लागत असल्यास आल्याचा रस, तूप आणि चिमटीभर साखर घालून घेतल्यास श्‍वास बसतो.
छातीत दुखत असल्यास आल्याचा रस खडीसाखर घालून घ्यावा.
आम्लपित्त, शूळ, अजीर्ण, पोटफुगी इत्यादी पोटांचे आजार असल्यास आलं आणि गूळ किंवा आलं आणि लिंबाचा रस यांचं समप्रमाणात सेवन करावं.
उलटी होत असल्यास, चक्कर येत असल्यास आल्याचा रस, खडीसाखर घालून घ्यावा.

No comments:

Post a Comment