Tuesday 21 January 2020

हिंगाचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थांमध्ये वापरला जाणरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग. हिंगामुळे पदार्थांना विशिष्ट चव प्राप्त होते. परंतु हिंगामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. त्यात पोटाचे विकार तसेच पचनासंबंधीच्या तक्रारींवर हिंग गुणकारी ठरतो, हे बहुतेकांना माहीत आहे. मात्र, या व्यतिरिक्तही हिंगाचे आरोग्यदायी लाभ आहेत. त्या विषयी जाणून घेऊ..

* हिंगाच्या सेवनाने डोळ्यांचे काही विकार बरे होतात.
* काटा टोचल्यास किंवा शरीरात लाकडाचं तुस गेल्यास हिंग पाण्यात मिसळून त्या भागावर लावावं. वेदना थांबतीलच आणि काटाही निघून येईल.
* खाज, खरूज अशा त्वचाविकारांवर हिंग उगाळून लावावं. त्वचाविकार बरे होतात.
* बद्धकोष्ठतेची तक्रार असल्यास हिंग आणि खायचा सोडा हे मिर्शण रात्री घ्यावं. सकाळी पोट साफ होईल.
* पोटदुखी असेल तर हिंग, ओवा आणि मीठ यांचे मिर्शण खावे. पोटात जंत झाले असतील तर हिंग पाण्यात मिसळून एनिमा दिल्याने आराम मिळतो.
* भूक लागत नसेल तर तुपात थोडं हिंग भाजून आलं आणि लोण्यासोबत खावं.
* तीळाच्या तेलात हिंग घालून हे मिर्शण कानात घातल्यास कानदुखी बरी होते.
* उलट्या होत असतील तर हिंग पाण्यात मिसळून तो लेप पोटावर लावावा.
* हिंग गरम करून त्याचा लेप कपाळाला लावल्यास डोकेदुखी थांबते.

No comments:

Post a Comment