Tuesday, 28 January 2020

हे माहीत आहे का?

सद्य:स्थितीत रक्तगटांविषयी बहुतेकांना माहिती असते. कोणत्या रक्तगटाचे रक्त कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं याचीही बर्‍यापैकी माहिती असते. परंतु रक्तगटाशी संबंधित धोक्यांबाबत फारसं जाणून घेतलं जात नाही. आज त्याचीच माहिती घेऊ..
लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर अँटिजेन्स नामक घटक असतात. यामुळे प्रत्येक रक्तगटाच्या व्यक्ती काही प्रकारच्या विकारांचा प्रतिकार करू शकतात तर काही विकारांना बळी पडू शकतात. ए, बी, ओ आणि एबी हे प्रमुख रक्तगट आहेत. रक्तगटाचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणं आरएच या घटकावर अवलंबून असतं. आरएच हा सुद्धा अँटिजेन आहे. रक्तगटाशी संबंधित विकार होऊ नये या हेतूने आपण जीवनशैलीशी संबंधित बदल करू शकतो. 

ओ रक्तगटाच्या लोकांना हृदयविकाराची शक्यता कमी असते तर एबी, बी रक्तगट असणार्‍यांना याचा धोका जास्त असतो. ओ रक्तगटाच्या लोकांना अल्सरची शक्यता जास्त असते. ए आणि बी रक्तगट असणार्‍यांना रक्ताच्या गुठळ्याचा धोका ३0 टक्क्यांनी जास्त असतो तर ओ रक्तगटाच्या लोकांना तो बराच कमी असतो. 
एबी रक्तगट असणार्‍यांना हा धोका २0 टक्क्यांपर्यंत असतो. ओ रक्तगटाच्या लोकांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका कमी तर इतर रक्तगटांना जास्त असतो. ए रक्तगट असणार्‍यांना गॅस्ट्रिक कॅन्सरचा धोका सर्वात जास्त असतो. 
ओ रक्तगट असणार्‍यांना स्वादुपिंडाच्या कर्करोगाची शक्यता कमी तर ए रक्तगट असणार्‍यांना स्वादुपिंडाच्या कॅन्सरचा धोका ३२ टक्क्यांपर्यंत असतो.

No comments:

Post a Comment