Monday, 20 January 2020

कोरड्या खोकल्याचा त्रास होतोय तर हे करा

संक्रांतीनंतर थंडी हळुहळू कमी होत असली तरी सध्या थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वाढत्या थंडीमुळे खोकल्याचा त्रास जाणवतो. विशेषत: रात्रीच्या वेळी खोकल्याचं प्रमाण वाढतं. औषधांसोबतच काही घरगुती उपायांनीही लवकर आराम पडू शकतो. त्यामुळे औषधोपचारांसोबत हे उपचार करून बघायला हरकत नाही. अशा उपचारांविषयी..

* मिठाच्या पाण्याच्या गुळण्या हा कोरड्या खोकल्यावरील रामबाण उपाय ठरतो. पेलाभर पाणी गरम करून त्यात चिमूटभर मीठ घालावं आणि या पाण्याने गुळण्या कराव्या. यामुळे लवकर आराम पडेल.
* झोपल्यानंतर सतत खोकला येत असेल तर मध घ्यावा. मधामुळे घशाला ओलावा मिळतो आणि खोकल्याचं प्रमाण कमी होतं. एक छोटा चमचा मध घेतल्याने आराम मिळू शकतो.
* झोपण्याआधी आलं घातलेला चहा प्यावा. ग्रीन-टी किंवा गरम पाणीही चांगले परिणाम दाखवेल. गरम पेयामुळे घशाला शेक मिळतो आणि खोकल्याचं प्रमाण कमी होतं.
* खूप खोकला असेल तर सपाट पृष्ठभागावर झोपू नये. उशी घेत नसाल तर खोकला जाईपर्यंत डोक्याला आधार द्या. यामुळे खोकला कमी होईल.
* नाकाला बाम लावा. सर्दीमुळे नाक चोंदलं असेल तर यामुळे आराम मिळेल आणि खोकला थांबू शकेल.

No comments:

Post a Comment