Tuesday, 28 January 2020

कानात तेल घालणे अयोग्यच, बुरशीची शक्यता

कानाची काळजी घ्या
कान सुकला, कानात खाज येऊ लागली किंवा कानात दुखत असेल तर अनेक जण कानात तेल घालतात. मात्र कानात तेल घालणे योग्य नसल्याचे तज्ञ म्हणतात. लहानपणी आपली आजी किंवा आई आपण झोपल्यानंतर आपल्या कानात तेल घालायची. आता तुम्हीदेखील तुमच्या मुलांच्या कानात तेल घालता. कानात तेल घालणे चांगले असते, त्यामुळे कानात मळ साचत नाही असे म्हटले जाते. मात्र, कानात तेल टाकणे हे अयोग्य असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

कान सुकला, कानात खाज येऊ लागली किंवा कानात दुखत असेल तर अनेक जण कानात तेल घालतात. बाळांना मालिश करताना तर हमखास त्यांच्या कानात तेल घातले जाते. तसेच सध्या थंडीत कान सुकतात आणि कानांमध्ये खाज येते, अशावेळीही कानाला ओलसरपणा देण्यासाठी कानात तेल घातले जाते. मात्र, त्यामुळे कानाची समस्या अधिक वाढण्याची शक्यता असते.
कान-नाक-घसा तज्ञ डॉ. राजेंद्र बोहरा यांनी सांगितले, लहान मुले असो किंवा प्रौढ व्यक्ती कुणाच्याही कानात तेल घालणे अयोग्य आहे. कानात तेल घातल्याने कानात बुरशी तयार होते. सध्या अनेक तेलांमध्ये भेसळ असते, त्यामुळे त्याचे कानात अधिक दुष्परिणाम होतात. तसेच कानात नेमके काय झाले आहे हे आपल्याला माहिती नसते, त्यामुळे डॉक्टरांना दाखवावे. कानात मळ असल्यास इअर ड्रॉप्स मिळतात किंवा कान फुटला असल्यास, कानातून पू येत असल्यास औषधे मिळतात. मात्र, इअर ड्रॉप्स किंवा औषधेही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
डॉक्टर सांगतात.., कानात तेल घालू नये, त्यामुळे बुरशी येते. कानात मळ असल्याचे वाटत असेल किंवा कानात खाज येत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार करावेत. कानात खाज येत असल्यास जास्त खाजवूही नये, त्यामुळे जखमेतून हिस्टॅमिन घटक बाहेर पडतो आणि त्यामुळे जास्त खाज येते.

No comments:

Post a Comment