मीठ हा आहारातला अत्यावश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण र्मयादित असणं गरजेचं आहे. मीठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यविषयक अनेक प्रश्नांना जन्म देतं. मीठाच्या अतिरिक्त सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, जाडी अथवा पक्षाघात यासारखे धोके वाढतात. त्यामुळेच मीठाऐवजी सैंधव वापरणं उपकारक ठरतं. शरीरात मीठाचं जास्तीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवी. आहारातील बीन्सचं प्रमाण वाढवल्यास शरीरातील मीठाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.
तज्ज्ञांच्या मते, आहारात बीन्सचं प्रमाण जास्त असेल तर शरीरातील मीठाचं प्रमाण १0 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. दह्यमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्रोटीनची मात्रा असते. म्हणूनच दह्यच्या सेवनाने शरीरातील मीठाची अतिरिक्त मात्रा कमी होते. मत्स्याहारामुळेही शरीरातील मीठाची अतिरिक्त मात्रा कमी होण्यास मदत होते. विशेषत: साल्मन अथवा ट्यूना माशांमुळे हे काम साधतं. उकडलेला बटाटा सालीसह खावा. यामुळे बटाट्याच्या सालींमध्ये असणार्या पोटॅशियमचा लाभ मिळतो आणि शरीरातील अतिरिक्त मीठाचं प्रमाण कमी होतं. सुक्या मेव्यामध्ये, विशेषत: बेदाण्यामध्ये पोटॅशियमची मात्रा अधिक असते. त्यामुळे रोजच्या आहारात बेदाण्यांचा समावेश असल्यास शरीराला अतिरिक्त खनिजांचा त्रास जाणवत नाही. पिकलेलं केळ आणि संत्र्यांमध्येही पोटॅशियम अधिक प्रमाणात असतं. त्यामुळे हे घटकही नित्याच्या आहारात समाविष्ट करायला हवेत. हाय फायबर फूड ओट्स, ताज्या भाज्या, गव्हाचा ब्रेड यातील फायबरमुळे शरीरातील अतिरिक्त मीठाचं प्रमाण कमी होतं. आहारात मिठाचे प्रमाण वाजवीपेक्षा अधिक असू नये, असा सल्ला आवर्जून दिला जातो. याचे कारण मिठाचे अधिक प्रमाणातील सेवन काही व्याधींना निमंत्रण देणारं ठरतं.आहारात मीठाचे जास्त प्रमाण असेल तर रक्तप्रवाहाचा वेग वाढतो आणि रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण येतो. संपूर्ण शरीरात रक्तप्रवाह योग्य दाबाने सुरू राहण्यासाठी मग हृदयाला खूप मेहनत करावी लागते. यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयविकाराची समस्या निर्माण होते. तसेच ऑस्टिओपोरोसिस, मूतखडा, अस्थमा आणि गॅस्टीक कॅन्सर असे विकार होण्याची शक्यताही वाढते. यावरून मिठाचे र्मयादित प्रमाणात सेवन किती महत्त्वाचे आहे हे लक्षात येईल. त्यादृष्टीने मिठाचे प्रमाण कसे कमी करता येईल ते जाणून घेऊ..

* मिठाचे प्रमाण कमी करण्यासाठी चीज, पापड, लोणची, खारवलेले काजू, पिस्ते, वेफर्स, फरसाण, सोया, टोमॅटो, मायोनिज आणि इतर सॉस, ब्रेड, इस्टंट सूप, नूूडल्स, पास्ता असे पदार्थ टाळावेत. * पोटॅशियममुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रणात राहते. यामुळे केळं, संत्र, पीच, टरबूज, पालक अशी पोटॅशियमचे प्रमाण जास्त असणारी फळे आणि भाज्या खाव्यात * शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचे प्रमाण वाढवावे. * मांस आणि भाज्या साठवण्यासाठी मीठाच्या पाण्याचा वापर केला जातो. त्यामुळे हे घटक स्वच्छ धुवून घ्या.
No comments:
Post a Comment