Sunday, 19 January 2020

गुणकारी वेलची

वेलदोडे अथवा वेलची हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. वेलचीमुळे पदार्थाला छान चव आणि मंद सुगंध मिळतो. विविध सरबतांमध्येही वेलदोड्याची पूड वापरली जाते. जेवणाचा स्वाद वाढवणारी छोटीशी वेलची आरोग्याच्या दृष्टीनंही गुणकारी असते. मसाल्याचे आणि साधे असे वेलदोड्यांचे दोन प्रकार असतात. विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे अरोमा थेरपीतही वेलचीचा वापर केला जातो.
वेलचीचे दोन्ही प्रकार आरोग्यासाठी लाभदायी आहेत.
घसा बसला असेल किंवा घशात वेदना जाणवत असतील तर सकाळी आणि रात्री झोपण्याआधी छोटी वेलची चावून चावून खावी. त्यानंतर गरम पाणी प्यावं. यामुळे घशाशी संबंधित तक्रारी दूर होतील. वेलचीच्या नियमित सेवनाने आवाजाचा पोत सुधारतो. पचनशक्ती वाढविण्यात वेलचीची महत्त्वाची भूमिका आहे. जेवणानंतर वेलची चघळल्यास पचनाच्या तक्रारी दूर होतात. वेलचीत मूत्रवर्धक फायबरसोबतच पोटॅशियमचं भरपूर प्रमाण असल्यानं रक्तदाब नियंत्रणात राहतो. बराचकाळ उचकी थांबत नसेल तर वेलची चघळावी. यामुळे लगेच आराम मिळतो. उचकी थांबते.

No comments:

Post a Comment