Thursday 23 January 2020

खरंच!शीतपेये प्यायची गरज आहे का?

मधुमेह, लठ्ठपणा,हृदयरोगाला  आमंत्रण
उकाडा असेल किंवा जास्त दमल्यावर अनेकजण-शीतपेय घेतात. पण ,खरंच शीतपेय पिण्याची गरज आहे का? ज्याची शरीराला गरज नाही,असे हे शीतपेय आहे. वास्तविक, शीतपेय घेणे चांगले नसते. त्यामध्ये घातक घटक असतात, असे अनेकदा ऐकतो. मात्र तरीही शीतपेये घेण्याची सवय अनेकांना असते. जंक फूड जसे घातक असते, तसेच शीतपेयेही घातक असतात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. शीतपेयांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. खरंतर शीतपेये ही अनैसर्गिक पेये आहेत. ज्यांचे पोषणमूल्य नगण्य असून, शरीरस्वास्थ्य हानिकारक, असे कार्य असते.
कार्बनयुक्त शीतपेयांचे अतिसेवन केल्याने शरीरावर होणारे दुष्परिणाम आपण पाहूया.
१) कार्बनडाय ऑक्साईड वायूवर अतिरिक्त दबाव आणून तो शीतपेयामधील पाण्यामध्ये विरघळविला जातो. आपण शीतपेय सेवन केल्यानंतर साठलेला हा वायू मग नाका-तोंडावाटे बाहेर पडतो. छातीत जळजळ होते. क्वचितप्रसंगी वायू बाहेर पडताना अन, आम्लदेखील नाका- तोंडावाटे बाहेर पडू शकते. आपल्याला अतिशीतपेय सेवनाने आम्लपित्ताचा
असा त्रास जडू शकतो. २) कार्बनयुक्त शीतपेयाच्या एका कॅनमध्ये तब्बल दहा चमचे साखर असते. एक कॅन शीतपेय पिले असता शरीरास पूर्ण दिवसभर आवश्यक असणारी शर्करा एकदमच मिळते. त्यामुळे नियमित शीतपेय सेवन करणे व म्हणजे लठ्ठपणास आमंत्रण आहे. ३) हे दहा चमचे शर्करायुक्त पेय पिल्याने २० मिनिटांत तुमच्या रक्तशर्करेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. तिला नियंत्रित करण्यासाठी इन्सुलिनची प्रक्रिया शरीरात घडते. व त्यामुळे नियमित शीतपेय सेवनामुळे मधुमेहाचा विकार जडू शकतो.
४) बऱ्याच शीतपेयांमध्ये 'कॅफेन' हे उत्तेजक असते. शीतपेय सेवनानंतरसुमारे ४० मिनिटांत हे कॅफेन शरीरात शोषले जाते. त्यावेळी आपला रक्तदाब वाढतो. कधी-कधी हृदयाची गती विषम होते. म्हणजेच नियमित शीतपेय सेवनामुळे उच्च रक्तदाब किंवा इतर हृदयरोग आपणास ग्रासू शकतात.  ६) शीतपेयांमध्ये अतिप्रमाणात 'फॉस्फेट' असते. कॅल्शिअमपेक्षा अधिक प्रमाणात फॉस्फेट सेवन केल्यामुळे हाडे ठिसूळ होतात. वाढत्या वयातील मुलांना शीतपेय सेवन त्यामुळेच घातक ठरते. ७) शीतपेयांमधील आम्लामुळे दातांच्या आवरणाची (इनामल) झीज करते. आपल्या मुखातील शर्करेबर पोसले जाणारे विषाणूशीतपेय सेवनाने वाढतात. ते जी रसायने तयार करतात, त्यामुळे दाताचे आवरण झिजते. वारंवार होत राहिले तर कालांतराने दात किडतात.
आता आपल्या लक्षात आलेच असेल की, शीतपेय सेवनाचा अतिरेक हा आरोग्यास हानिकारक आहे. याउलट नैसर्गिक पेये, उसाचा रस, लिंबू सरबत, कोकम सरबत आणि साधे पाणी भरपूर क्षार आणि मूलद्रव्ये मुबलक प्रमाणात देणारी 'सुपर पॉवर' देणारी द्रव्ये आहेत. त्यांचा समावेश आहारात केलात तर 'सुपर पॉवर' मिळेल.

No comments:

Post a Comment