Thursday 25 June 2020

योगासनाच्या मार्गदर्शनासाठी अॅप

योगी फाय (YogiFi)
पर्सनलाईज योगासनाच्या प्रशिक्षणासाठी हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. नियमित सत्रांशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असणारी योगांची सत्रेही इथे उपलब्ध आहेत. प्राथमिक पातळीवर वॉर्मअप्स, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची विविध सत्रे निश्चितच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीपासून योग शिकायचा असल्यास तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय तुमच्या नियमित योगांच्या सत्रांचे विश्लेषण शेवटी दिले जाते.


पॉकेट योगा (Pocket Yoga)
प्राथमिक व्यायाम, प्राणायाम आणि योगांच्या विविध सत्रांच्या माध्यमातून तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले जाते. एखादा आसनाचा प्रकार करताना शरीराची स्थिती कशी असावी, शरीराला ताण कसा द्यावा, नेमकी कुठे खबरदारी घ्यायची, त्याचे फायदे याविषयी इत्थंभूत माहिती या अॅपवर तुम्हाला मिळते. तुमच्या गरजेप्रमाणे वेगवेगळ्या कालावधींची आणि पातळीनुसारची अनेक सत्रे इथे उपलब्ध आहे.

काम (Calm)
निरोगी शरीरासोबत एकाग्रतेसाठी योगांबरोबर प्राणायाम हे खूप फायदेशीर आहे. प्राणायामाचे महत्त्व, त्याची सध्या असलेली गरज, प्राणायामाची विविध सत्रे उदा. एकाग्रतेसाठी, शांत झोपेसाठी, तणावमुक्तीसाठी, चिडचिडेपणा कमी करण्यासाठी वेगवेगळी सत्रे तुम्हाला निश्चित फायदेशीर ठरतील. त्याशिवाय मन प्रसन्न करणारी संगीताची खास मेजवानीही इथे तुम्हाला आकर्षित करते.

डाउन डॉग (Down Dog)
तुमच्या आवडीप्रमाणे वेळ निश्चित करून दररोज योगाचे नवनवीन सत्र तुम्हाला या अॅपवर अनुभवता येतात. योगासनांचे विविध प्रकार तुम्हाला शिकवले जातात. विशेष म्हणजे, विविध भाषांत योगाचे मार्गदर्शन या ठिकाणी उपलब्ध आहे. या अॅपचे वैशिष्ट्य म्हणजे योगाचा एकच प्रकार तुम्हाला पुन्हा-पुन्हा शिकवत नाही. योगासनांशी साधर्म्य असणारे संगीतही येथे ऐकायला मिळते. टप्प्यानुसार विशिष्ट वेळांची सत्रे इथे अनुभवायला मिळतात.

ब्रिद (Breathe)
अॅपल वॉच वापरणाऱ्यांना ब्रिद अपविषयी नक्कीच माहिती असेल. श्वसनासंबंधीचे प्राणायाम आणि ते दिवसातून कधी करायचे, याबाबत ते तुम्हाला आठवणही करून देते. हे अॅप तुमच्या प्राणायामावर आणि श्वसनावर बारकाईने लक्ष देत तुम्ही एका सत्रात किती श्वासोच्छ्रास केला, याबाबतची माहितीही तुम्हाला देते.

No comments:

Post a Comment