* दालचिनीचे फायदे- दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडपासारखे असते. पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी. उंचीचे असते. त्यांच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल, जाड, मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते. दालचिनी हे बागायती पीक असले तरीदेखील समुद्रसपाटीपासून १००० मी. उंचीवर हे पीक कोठेही घेतले जाते.
दालचिनीला सुगंध असतो. यांचा वापर सर्वत्र मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून करतात.याचे तेलही काढले जाते. दालचिनीची पानेदेखील 'तेजपत्र' म्हणून मसाल्यात वापरतात. दालचिनी चवीला तिखट-गोड असते. दालचिनी उष्ण, पाचक, कफनाशक, गुणधर्माची आहे. मनाची अस्वस्थता कमी करते. यकृताचे कार्य सुधारणा करते. स्मरणशक्ती वाढवते. आल्याचे फायदेआल्याच्या लागवडीसाठी उष्ण आणि दमट हवामानाची गरज असते, त्यामुळे उष्ण कटिबंधात सर्वत्र त्याची लागवड होते.ते खरीप तसेच रब्बी हंगामात येते.याला पाण्याची फारशी गरज लागत नाही. मुरुमाड, ठिसूळ आणि वालुकामय शेतजमिनीमध्ये आले उगवू शकते. परंतु चांगले उत्पादन येण्यासाठी एकाच जमिनीत सातत्याने आले न लावता जमीन आलटून-पालटून आल्याची शेती करावी.
जगभर आल्याचा उपयोग मसाल्याचा पदार्थ आणि औषधी म्हणून होतो. आल्याला 'महाऔषधी' म्हणतात. यावरूनच त्याचे औषधी परिणाम ध्यानात येतात.
* आले -आले हे अडीच-तीन फूट वाढणाऱ्या झुडपाची, जमिनीखाली उगवणारी, पिवळ्या रंगाची मुळी होय. आले दीर्घकाळ टिकण्यासाठी उन्हात तसेच काही ठिकाणी दुधात बुडवून वाळवून त्याची सुंठ बनवतात. सुंठ आल्यापेक्षा उग्र असते. सुंठीचे तेल काढतात.ओल्या मातीत ठेऊन आले बराच काळ टिकते.
* दही खाण्याचे फायदे- थंड आणि मधुर दही कोणाला आवडत नाही? दही कशा सोबतही खा - त्याची चव वाढवतेच. दही फक्त आहाराची लज्जतच वाढवत नाही तर आरोग्यही प्रदान करते. म्हणून तर सर्व आहारतज्ज्ञांची यादी दह्याशिवाय सुरू आणि पूर्ण होत नाही. सर्वच प्राण्यांचे दूध आणि दुग्धजन्य पदार्थ पौष्टिक आहेत, परंतु या पौष्टिकतेमध्ये दह्याचा क्रमांक वरचा लागतो, कारण दह्यासोबत खाल्लेले अन्न सहज पचते आणि त्या अन्नातील जीवनसत्त्वे आणि प्रथिने सहजरीत्या रक्तात आणि शरीरात शोषली जातात. म्हणून दह्याला 'परिपूर्ण आहार' म्हणून सर्वत्र मान्यता आहे.
No comments:
Post a Comment