Tuesday, 9 June 2020

खडी साखर खाण्याचे फायदे

खोकला असो किंवा घसा खवखवत असो अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते. घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो. खडीसारखेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. उन्हाळ्यात नाकातून रक्त येते त्यासाठी खडीसाखरेच्या पाण्याचा वास घेतल्यास फायदा होतो. लोणी आणि खडीसाखर हे समप्रमाणात घेऊन हात आणि पाय यांना लावल्यास जळजळ कमी होते. खडीसाखरेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला थंडपणा मिळतो.

घसा खवखवणे आणि खोकला असो किंवा घसा खवखवत असो अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते. घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो. सतत खोकला येत असणार्‍या व्यक्तीस एक खडीसारखेचा एक खडा चघळायला द्यावा थोड्याच वेळात खोकला गायब होईल.
अतिउष्ण व कोरडी हवा : खडीसारखेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. त्यामुळे खूप जास्त उन्हाळ्यात सरबतात खडीसाखर विरघळवून प्यायल्यास उष्णतेचा त्रास कमी होतो. कारण खडीसाखर गोड असल्याने ती ग्लुकोजचे रूपांतर शरीराला ऊर्जा देण्यासाठी करते.
तोंड येणे : तोंड आल्यास वेलदोडा आणि खडीसाखर एकत्र करून त्याचा लेप बनवा. हा लेप तोंड आले आहे त्यावर लावल्यास तोंड लवकर बरे होईल.
नाकाचा घोळणा फुटणे : उन्हाळ्यात नाकातून रक्त येते त्यासाठी खडीसाखरेच्या पाण्याचा वास घेतल्यास फायदा होतो.
लैंगिक कमजोरी : केशर आणि दुधाबरोबर खडीसाखरेचे सेवन केल्यास पुरुषांमध्ये लैंगिक शक्ती वाढते.
रक्ताल्पता : केशर आणि खडीसाखर घालून कोमट दूध प्यायल्याने शरीराला शक्ती प्रदान होते. त्यामुळे हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते.
हात किंवा पायांची जळजळ : लोणी आणि खडीसाखर हे समप्रमाणात घेऊन हात आणि पाय यांना लावल्यास जळजळ कमी होते.
कमजोर दृष्टी आणि डोकेदुखी : डोळ्यांची दृष्टी कमी झाली किंवा डोकेदुखी हे त्रास होत असतील तर खडीसाखर, बडीशेप आणि बदाम हे समप्रमाणात घेऊन बारीक करावेत. ही पावडर सकाळ-संध्याकाळ गरम दुधाबरोबर घ्यावी.

No comments:

Post a Comment