Saturday 20 June 2020

योगा सर्वांसाठी उपयुक्त

पूर्ण जगाने योगशास्त्राला डोक्यावर घेतले आहे. एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगामध्ये प्रत्येक जण ताणतणावग्रस्त होतो आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ऐन तारुण्यात कामातील कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी अनेक जण योगसाधनेकडे धाव घेत आहेत. योग हा कल्पवृक्ष आहे. योगामुळे विविध आजारांतून मुक्तता होते. उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, मणक्याचे आजार, मानसिक ताणतणाव,  अनेक आजारांवर योगा हा रामबाण उपाय आहे.
नियमित योगाभ्यासामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारते. योगासनात प्रत्येक स्नायूंची, अवयवांची हालचाल होते. त्यामुळे प्रत्येक अवयवाला होणारा रक्ताचा पुरवठा सुधारतो. शरीराला प्राणवायूचा पुरवठा योग्य पद्धतीने होतो. रक्ताचे शुद्धीकरण आणि अभिसरण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे उत्तम निरोगी प्रकृतीसाठी योगा करणे उपयुक्त आहे. योगा कर्मचाऱ्यांसाठी फायदेशीर आहे. बऱ्याचदा कारखाना किंवा कार्यालयांमध्ये काम करणाऱ्यांना बैठे काम करावे लागते. त्यामुळे शरीराची हालचाल होत नाही. काम करताना बौद्धिक कार्यक्षमता, निर्णयक्षमता याचीदेखील आवश्यकता असते. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी कपालभाती केल्यास त्याचा त्यांना फायदा होऊ शकतो. अनेकदा बैठ्या
मुळे स्थूलता येते. यावरदेखील योगासने, प्राणायाम आणि योग्य आहार उपयुक्त ठरू शकते. योगा विद्यार्थ्यांसाठीही उपयुक्त आहे. अभ्यासक्रमात झालेले बदल आणि शिक्षणक्षेत्रात निर्माण झालेली स्पर्धा यामुळे विद्यार्थ्यांना अनेक त्रास सहन करावे लागतात. अभ्यास करताना बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि कार्यक्षमता यांची आवश्यकता असते. या सर्वांसाठी नियमित योगा उपयुक्त ठरू शकतो. विशेषतः सूर्यनमस्कार, ओंकार ध्यान, भ्रामरी प्राणायाम आणि योगनिद्रा हे अत्यंत परिणामकारक आहे. महिला आणि ज्येष्ठांसाठी देखील योगा अतिशय  उपयुक्त आहे. महिलांनी ओंकारजप, प्राणायाम, ध्यान, योगनिद्रा केल्यास उपयुक्त ठरू शकते. ज्येष्ठ नागरिकांना उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी प्रकारचे आजार असतात. त्यावर कपालभाती करणे अधिक योग्य आहे.
वयोमानामुळे मनात असलेला एकटेपणा घालवण्यासाठी योगविद्या फायदेशीर ठरू शकते. योगा करत असताना त्या संदर्भात संदर्भात योग्य मार्गदर्शन घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

No comments:

Post a Comment