आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा
* तुळशीची पाने- तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. या घटकांमुळे पॅकिअॅट्रिक बीटा सेल्सचे (इन्सुलिनचा साठा व नियंत्रण करणाऱ्या पेशी) कार्य सुरळीत होऊन इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच तुळशीच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे तणावावर नियंत्रण राहण्यास मदत होते.
*अळशी-अळशीमध्ये फायबर असल्यामुळे पचनास मदत होऊन चरबी आणि शर्करेचे योग्य शोषण होते. मधुमेहींनी अळशीच्या बिया खाल्याने जेवणानंतरच्या शर्करेची पातळी जवळपास 28% पर्यंत कमी होते.
* दालचिनी- दालचिनीमुळे इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहते. दररोज अर्धा टिस्पून दालचिनीची पावडर खाल्याने इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढून वजन नियंत्रित राहते. हृदयविकाराचा त्रास कमी करण्यासाठी दालचिनी उपयुक्त आहे.
* शेवग्याची पाने- शेवग्याच्या पानांमध्ये ऊर्जा वाढवण्याची क्षमता असते.शेवग्याच्या पानांमुळे अन्नाचे पचन होऊन रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते.
*कारले- कारल्यामध्ये इन्सुलिनचे प्रमाण जास्त असते त्यामुळे रक्तातील शर्करेचे प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. कारले मधुमेहींसाठी अतिशय उपयुक्त मानले जाते. कारण त्यामधील कॅराटिन आणि मोमोर्डिसीन हे घटक रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत करतात.
No comments:
Post a Comment