Wednesday, 3 June 2020

खजूर खाण्याचे फायदे

कोरोनाच्या या दिवसात रोगप्रतिकारक शक्ती वाढणे फार गरजेचे आहे. खनिजं, जीवनसत्वं अशा अनेक पोषकद्रव्यांनी समृद्ध असा खजूर आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी समजला जातो. खजुरात कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं. प्रत्येक वयोगटातल्या व्यक्तीसाठी खजूर उपयुक्त असतो. म्हणूनच प्रत्येकाने नियमितपणे खजूर खायला हवा. तर जाणून घेऊ यात खजुराचे फायदे..

सुमधुर चवीचा खजूर थंड, पौष्टीक आणि बलवर्धक असतो. तो कॅल्शियम, पोटॅशिअम, कबरेदके, प्रथिनं, लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस अशा पोषक घटकांनी समृद्ध असतो.
खजुरामुळे रक्त तयार होण्याची प्रक्रिया अधिक गतीमान होते. तसंच हृदय आणि मेंदूला बळ मिळतं. आतड्यांशी संबंधित व्याधींवर खजूर अत्यंत गुणकारी समजला जातो. आयुर्वेदानुसार खजूर वात, पित्त आणि कफनाशक असतो. खजुरामुळे पचनशक्ती वाढते आणि पचनक्रिया सुधारते. अशक्तपणावर खजूर फारच गुणकारी आहे. लहान मुलांना अशक्तपणा आला असेल तर खजूर आणि मध यांचं चाटण द्यावं. लगेच गुण येतो. रात्री बिछाना ओला करण्याची सवय असलेल्या मुलांना दुधासोबत खजूर देणं फायद्याचं ठरतं. खजुरामुळे आतड्यांना बळ मिळतं. तसंच शरीरही बळकट होतं. खजुरामुळे आतड्यातले अपायकारक विषाणू नष्ट होतात तर उपयुक्त जीवाणूंची वाढ होऊन आतड्यांची कार्यक्षमता वाढते. खजुरामुळे दातांचं आरोग्य सुधारतं. यातल्या कॅल्शियमुळे दात मजबूत होतात. तसंच फ्लोरिन नावाच्या खनिजामुळे दातांच्या इतर समस्याही दूर होतात. कमी रक्तदाबाची समस्या असणार्‍यांसाठी खजूर हे नैसर्गिक औषध आहे. कमी रक्तदाबाचा त्रास असलेल्या रुग्णांनी रोज तीन ते चार खजूर गरम पाण्याने स्वच्छ धुवून खावेत. कमी रक्तदाबाची तक्रार दूर होईल.

No comments:

Post a Comment