Thursday, 25 June 2020

योगासनाच्या मार्गदर्शनासाठी अॅप

योगी फाय (YogiFi)
पर्सनलाईज योगासनाच्या प्रशिक्षणासाठी हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. नियमित सत्रांशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असणारी योगांची सत्रेही इथे उपलब्ध आहेत. प्राथमिक पातळीवर वॉर्मअप्स, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची विविध सत्रे निश्चितच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीपासून योग शिकायचा असल्यास तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय तुमच्या नियमित योगांच्या सत्रांचे विश्लेषण शेवटी दिले जाते.

Saturday, 20 June 2020

योगा सर्वांसाठी उपयुक्त

पूर्ण जगाने योगशास्त्राला डोक्यावर घेतले आहे. एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगामध्ये प्रत्येक जण ताणतणावग्रस्त होतो आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ऐन तारुण्यात कामातील कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी अनेक जण योगसाधनेकडे धाव घेत आहेत. योग हा कल्पवृक्ष आहे. योगामुळे विविध आजारांतून मुक्तता होते. उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, मणक्याचे आजार, मानसिक ताणतणाव,  अनेक आजारांवर योगा हा रामबाण उपाय आहे.

Tuesday, 16 June 2020

असे ठेवा मधुमेहाला दूर

आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा
* तुळशीची पाने- तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. या घटकांमुळे पॅकिअॅट्रिक बीटा सेल्सचे (इन्सुलिनचा साठा व नियंत्रण करणाऱ्या पेशी) कार्य सुरळीत होऊन इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच तुळशीच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे तणावावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

अशी घ्या उतार वयात काळजी

जसजसं वय वाढत जातं, तसतशी शरिरात कॅल्शियम निर्मितीची प्रक्रिया मंदावते. परिणामी एखादं हाड फॅक्चर झालं, तरी मग ते भरुन येण्यास वेळ लागतो. त्यामुळे उतारवयात अधिक काळजी घ्यावी लागते. वयोवृद्ध किंवा ज्येष्ठ नागरिकांमधील विकलांगता आणि आजाराचे प्रमुख कारण म्हणजे हे लोक खूपच अशक्त झालेले असतात.या अशक्तपणाचे मुख्य कारण बऱ्याचदा कुपोषण किंवा पोषक आहाराची कमतरता हे असते. अशावेळी या लोकांना पुरेसा योग्य आहार आणि पूरके दिली गेली तर अशक्तपणाचा धोका कमी होतो.

दालचिनी, आले आणि दही खाण्याचे फायदे

* दालचिनीचे फायदे- दालचिनीचे झाड सदाहरित आणि छोट्या झुडपासारखे असते. पूर्ण वाढलेले झाड ६ ते १५ मी. उंचीचे असते. त्यांच्या खोडाची साल निवडून घेऊन वाळवतात.त्यांचा आकार कौलासारखा गोल, जाड, मऊ आणि तांबूस रंगाचा असतो. दालचिनीची पैदास कोणत्याही प्रकारच्या जमिनीत होऊ शकत असल्याने अत्यंत सुपीक जमिनीपासून मुरुमाड, रेताड जमिनीत दालचिनी पिकते. दालचिनी हे बागायती पीक असले तरीदेखील समुद्रसपाटीपासून १००० मी. उंचीवर हे पीक कोठेही घेतले जाते.

Sunday, 14 June 2020

आला पावसाळा,तब्येत सांभाळा

उन्हाने अंगाची लाही लाही होत असतानाच आकाशात
ढगांनी गर्दी केली. अचानक पावसाच्या धारा बरसू लागल्या. अशा हवामान बदलाचा परिणाम थेट आरोग्यावर होतो. अशा वेळी तब्येतीची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. पावसाळ्यात दूषित पाण्यामुळे होणाऱ्या आजारांचे प्रमाण सर्वाधिक असते. म्हणून वापरातील सर्व पाण्यावर किमान तुरटी फिरवून ते वापरावे. अतिसार, गॅस्ट्रो, कॉलरा यांच्यासारखे जलजन्य आजार हे या दिवसांत अधिक पसरतात. लहान मुलांना त्याची लगेचच बाधा होते. पावसाळ्यामध्ये संसर्गाची भीती अधिक असते. पाण्याच्या शुद्धतेबरोबर अन्य कारणांमुळेही हा प्रादुर्भाव होत असला तरीही रोगराई झपाट्याने पसरू नये, यासाठी स्वच्छता ठेवणे मुख्य प्रतिबंधक उपाय आहे.

Tuesday, 9 June 2020

खडी साखर खाण्याचे फायदे

खोकला असो किंवा घसा खवखवत असो अशा वेळी खडीसाखरेचे सेवन लाभदायक असते. घसा खराब झाल्यावर तो खूप दुखतो तेव्हा साखर खाल्ल्याने आराम मिळतो. खडीसारखेमध्ये गोडवा आणि थंडावा असे दोन्ही गुण असतात. उन्हाळ्यात नाकातून रक्त येते त्यासाठी खडीसाखरेच्या पाण्याचा वास घेतल्यास फायदा होतो. लोणी आणि खडीसाखर हे समप्रमाणात घेऊन हात आणि पाय यांना लावल्यास जळजळ कमी होते. खडीसाखरेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे स्मरणशक्ती वाढते आणि शरीराला थंडपणा मिळतो.