Wednesday, 22 January 2020

मीठाचा अतिरेक धोक्याचा

मीठ हा आहारातला अत्यावश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण र्मयादित असणं गरजेचं आहे. मीठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यविषयक अनेक प्रश्नांना जन्म देतं. मीठाच्या अतिरिक्त सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, जाडी अथवा पक्षाघात यासारखे धोके वाढतात. त्यामुळेच मीठाऐवजी सैंधव वापरणं उपकारक ठरतं. शरीरात मीठाचं जास्तीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवी.  आहारातील बीन्सचं प्रमाण वाढवल्यास शरीरातील मीठाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Tuesday, 21 January 2020

हिंगाचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थांमध्ये वापरला जाणरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग. हिंगामुळे पदार्थांना विशिष्ट चव प्राप्त होते. परंतु हिंगामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. त्यात पोटाचे विकार तसेच पचनासंबंधीच्या तक्रारींवर हिंग गुणकारी ठरतो, हे बहुतेकांना माहीत आहे. मात्र, या व्यतिरिक्तही हिंगाचे आरोग्यदायी लाभ आहेत. त्या विषयी जाणून घेऊ..

Monday, 20 January 2020

कोरड्या खोकल्याचा त्रास होतोय तर हे करा

संक्रांतीनंतर थंडी हळुहळू कमी होत असली तरी सध्या थंडीचा कडाका वाढत आहे. अशा वाढत्या थंडीमुळे खोकल्याचा त्रास जाणवतो. विशेषत: रात्रीच्या वेळी खोकल्याचं प्रमाण वाढतं. औषधांसोबतच काही घरगुती उपायांनीही लवकर आराम पडू शकतो. त्यामुळे औषधोपचारांसोबत हे उपचार करून बघायला हरकत नाही. अशा उपचारांविषयी..

शांत झोप हेच खरे डिप्रेशनवरचे औषध

रात्री जर शांत झोप झाली नाही तर त्यामुळे नैराश्य तीस टक्क्यांनी वाढते. जर रात्रीची झोप व्यवस्थित असेल तर तुमच्या भावनाही स्थिर राहतात, असे नैराश्यावरील संशोधनात दिसून आले आहे. नैराश्यावर औषधांचा वापर न करता उपाय करण्यावर भर देण्यात येत आहे. 'नेचर हय़ूमन बिहेवियर' या नियतकालिकातील शोधनिबंधात म्हटले आहे, की ज्यांचे मानसिक आरोग्य बिघडलेले आहे त्यांच्यात नैराश्य, चिंता ही खरी कारणे असतात. काही वेळा या लोकांमध्ये भीतीची भावनाही बळावलेली असते. पण याचे मूळ कारण त्यांची झोप शांत नसणे हे आहे.

Sunday, 19 January 2020

असं टिकावा फिटनेस

अनेकजण नियमित व्यायाम करतात. शक्यतो जीम टाळत नाहीत. मात्र आजारपण, प्रवास किंवा इतर कामांमुळे अधूनमधून व्यायाम चुकतो. कितीही प्रयत्न केला तरी ३६५ दिवस व्यायाम करणं शक्य नसतं. मात्र आठवड्यातले एखाद-दोन दिवस व्यायाम चुकला तरी अनेकांना खूप वाईट वाटतं. आपलं वजन वाढेल की काय, सगळी मेहनत पाण्यात जाईल की काय असे विचार मनात येतात. पण अधूनमधून व्यायाम चुकविल्यामुळे शरीर बेढब होत नसतं हे लक्षात घ्यायला हवं.

गुणकारी वेलची

वेलदोडे अथवा वेलची हा मसाल्याच्या पदार्थांमधील एक महत्त्वाचा घटक आहे. वेलचीमुळे पदार्थाला छान चव आणि मंद सुगंध मिळतो. विविध सरबतांमध्येही वेलदोड्याची पूड वापरली जाते. जेवणाचा स्वाद वाढवणारी छोटीशी वेलची आरोग्याच्या दृष्टीनंही गुणकारी असते. मसाल्याचे आणि साधे असे वेलदोड्यांचे दोन प्रकार असतात. विशिष्ट प्रकारच्या सुगंधामुळे अरोमा थेरपीतही वेलचीचा वापर केला जातो.

Saturday, 18 January 2020

तंदुरुस्तीसाठी मदत करणारे अ‍ॅप्स


अलिकडे बरेचजण आपल्या शरीराकडे काळजीने पाहायला लागले आहेत. शरीर तंदुरुस्त राहण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. यात फिटनेस अ‍ॅप्सदेखील मागे नाहीत. जर तुम्हाला तुमचं वजन कमी करायचम आहे, वजन वाढवायचं आहे. धावायचं आहे किंवा पोहायचं आहे. त्याचबरोबर रोज चालायचं आहे. यासाठी मार्गदर्शन कारणारे अ‍ॅप्स मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाले आहेत. त्यातल्या काही फिटनेस अ‍ॅप्सची ओळख करून देत आहे. या अ‍ॅप्सच्या माध्यमातून तुम्हाला तुमचे आरोग्य राखण्यास मदत होणार आहे. पाहूया काही फिटनेस अ‍ॅप्स...