पूर्वी वयाच्या पंचेचाळीस, पन्नास वयाला येणारी
मानदुखी आज वयाच्या २५ ते ३० वयोगटात येऊन
ठेपली आहे. वाढत्या वयाबरोबरच मान दुखीचा त्रास
टाळायचा असेल तर दैनंदिन हालचालींवर विशेष लक्ष ठेवले पाहिजे.
Monday, 11 May 2020
Saturday, 9 May 2020
अशी घ्या गुडघ्यांची काळजी
मैलोनमैल धावणं असो की एखादा नवा डान्स करून पाहणं असो, गुडघ्यांशिवाय काहीच करता येत नाही. प्रत्येक हालचालीची धुरा गुडघ्यांवर जपूया! असते. गुडघेदुखीचा त्रास सर्वच वयात जाणवत असला तरी वाढत्या वयासोबत हा त्रास वाढत जातो. गुडघेदुखीमुळे मांडी घालून बसणे, पाय दुमडून बसणे या हालचाली त्रासदायक होतात. तसेच गुडघेदुखी जास्त जाणवते ती जिने चढताना आणि उतरताना किंवा खाली बसल्यावर पुन्हा उठून उभे राहात असताना. वेळीच योग्य ती काळजी आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने
उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास निश्चीतच कमी होऊ शकतो.
उपाययोजना केली तर गुडघेदुखीचा त्रास निश्चीतच कमी होऊ शकतो.
Thursday, 7 May 2020
अशी घ्या डोळ्यांची काळजी
दैनंदिन जीवनात सर्वात जास्त वापरले जाणारे इंद्रिय म्हणजे डोळे. प्रत्येक क्षणी कार्यरत राहणाऱ्या डोळ्यांना झोपेपुरतीच विश्रांती मिळते. त्यामुळे आपल्या जीवनशैलीचा सर्वाधिक प्रभाव हा डोळ्यांवर पडतो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डोळ्यांची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते. तसेच लॉकडाउन काळात अनेकांचा स्क्रीनटाईम वाढलेला आहे. त्याचा थेट परिणाम डोळ्यांच्या आरोग्यावर होतो. त्यावेळी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
Wednesday, 6 May 2020
.. म्हणून जडतो हृदयविकार
हृदयविकार आणि पक्षाघात या विकारांमुळे भारतात अनेकांचा मृत्यू होतो. अनेक कारणांमुळे आपलं हृदय धोक्यात येतं. हृदयविकाराचा झटका हा अत्यंत धोकादायक असा आजार आहे. हृदयाच्या स्नायूंना होणारा रक्तपुरवठा कमी होत पूर्णपणे थांबला की हृदयविकाराचा झटका येतो. हृदयाच्या पंपिंगच्या क्षमतेवर परिणाम झाल्याने हृदयक्रिया बंद पडू शकते. यासोबतच हृदयाच्या भित्तीकांशी संबंधित विकार असतात. तसंच हृदयाच्या ठोक्यांची अनियमितताही हृदयविकाराला निमंत्रण देते.
दीर्घ श्वास घ्या... उत्साह...जोम वाढवा!
आपली मानसिक व शारीरिक स्थिती आणि श्वासोच्छवास यांचे जवळचे नाते असते. शारीरिक व मानसिक स्थितीतल्या बदलांमुळे श्वासोच्यासातही बदल होतो. त्याची गती व खोली वाटते. खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला प्राणवायूची गरज वाढलेली असते. अशा वेळी आपला खोल आणि जलद गतीने श्वासोच्यास सुरू होतो. मोठमोठे उसासे टाकतो.
असा टिकवून ठेवा - ट्रेकिंगसाठीचा फिटनेस!
ट्रेकिंगची आवड अनेकांना असते. हिवाळा आणि पावसाळ्यातही ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते, तर उन्हाळ्यात जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ट्रेकऐवजी जंगल भटकंती, किरले यांवर भ्रमंती केली जाते; मात्र पुढे ट्रेकिंगमध्ये तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा असतो. सध्या लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्य नाही, तरीही ट्रेकिंगमधील फिटनेस तुम्ही घरच्या घरी टिकवून ठेवू शकता.
Tuesday, 5 May 2020
वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषां'चा विचार करा आणि जीवन जागा
आयुर्वेदात 'त्रिदोष सिद्धांत' ची विस्तृत व्याख्या दिली आहे. वात, पित्त, कफ हे शरीराचे तीन दोष आहेत. या दोषांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या दोषांनुसार आहाराकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.
Subscribe to:
Posts (Atom)






