आपली मानसिक व शारीरिक स्थिती आणि श्वासोच्छवास यांचे जवळचे नाते असते. शारीरिक व मानसिक स्थितीतल्या बदलांमुळे श्वासोच्यासातही बदल होतो. त्याची गती व खोली वाटते. खेळताना किंवा व्यायाम करताना शरीराला प्राणवायूची गरज वाढलेली असते. अशा वेळी आपला खोल आणि जलद गतीने श्वासोच्यास सुरू होतो. मोठमोठे उसासे टाकतो.
Wednesday, 6 May 2020
असा टिकवून ठेवा - ट्रेकिंगसाठीचा फिटनेस!
ट्रेकिंगची आवड अनेकांना असते. हिवाळा आणि पावसाळ्यातही ट्रेकिंग मोठ्या प्रमाणावर केले जाते, तर उन्हाळ्यात जास्त उंचीचे ट्रेक केल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता असते. उन्हाळ्यात उष्णतेचे प्रमाण वाढते. त्यामुळे उन्हाळ्यात ट्रेकऐवजी जंगल भटकंती, किरले यांवर भ्रमंती केली जाते; मात्र पुढे ट्रेकिंगमध्ये तोच उत्साह कायम ठेवण्यासाठी रोज व्यायाम गरजेचा असतो. सध्या लॉकडाउनमुळे घराबाहेर पडणे शक्य नाही, तरीही ट्रेकिंगमधील फिटनेस तुम्ही घरच्या घरी टिकवून ठेवू शकता.
Tuesday, 5 May 2020
वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषां'चा विचार करा आणि जीवन जागा
आयुर्वेदात 'त्रिदोष सिद्धांत' ची विस्तृत व्याख्या दिली आहे. वात, पित्त, कफ हे शरीराचे तीन दोष आहेत. या दोषांचा शरीरावर परिणाम होत असतो. त्यामुळे या दोषांनुसार आहाराकडेही लक्ष देण्याची आवश्यकता आहे.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.
आयुर्वेदानुसार वात, पित्त आणि कफ या 'त्रिदोषा' वर आपलं शरीर चालतं, वाढतं आणि थांबतं. योग्य आणि विरुद्ध आहार-विहार, ऋतूचर्या आणि दिनचर्या यांकडे लक्ष दिलं नाहीतर शरीर अस्वस्थ होतं.
अशी घ्या जिभेची काळजी...
इतर अंगांप्रमाणे जीभ हेसुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तेवढीच जिभेची काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे ही समस्या अनेकांना उद्भवते. तोंड येण्याचा त्रासही अनेकांना सहन करावा लागतो.
गरिबांचा काजू: शेंगदाणे
शेंगदाण्याला गरिबांचे काजू असे म्हटले जाते. आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असलेल्या शेंगदाण्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. शेंगदाण्याचे तेल आरोग्यासाठी हितकारक ठरते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अनेक अँटी ऑक्सिडंटस उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच याशिवाय अनेक आवश्यक पौष्टिक घटकांचा पुरवठाही केला जातो.
Sunday, 3 May 2020
पायांचीही काळजी घ्यायलाच हवी!
दिवसभरात आपले पाय काय काय आणि किती सहन करत असतात. दिवसभर कामात असणाऱ्या पायांना आरामाचीही गरज असते. बदलत्या ऋतुमानानुसार पायांची काळजी घेणे आवश्यक असते. पावले स्वच्छ, सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी करता येणे शक्य आहे. हवामानानुसार आपल्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, हिवाळ्यात कोरडी होऊन फुटते आणि पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी लागते.
Saturday, 2 May 2020
प्रदूषण देतेय दम्याला निमंत्रण
मे महिन्याचा पहिला मंगळवार जगभरात दमा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा 5 मे म्हणजे हा दिवस साजरा होतोय. फुफ्फुसांचा अतिशय चिवट असा हा आजार आहे. जगभरातील दमेकऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के दमेकरी भारतीय आहेत. हा रोग थोडा अनुवंशिक असला तरी दम्याच्या वाढत्या प्रमाणामागे प्रदूषण हे मुख्य कारण आहे. श्वसनमार्गात दाह निर्माण करणारे वातावरणातले विषाणू आणि अर्थातच अॅलर्जीला कारणीभूत असणारे घरातील प्रदूषणकारी घटक दमा होण्यासाठी धोकादायक ठरू शकतात.
Subscribe to:
Posts (Atom)






