Tuesday, 5 May 2020

अशी घ्या जिभेची काळजी...

 इतर अंगांप्रमाणे जीभ हेसुद्धा एक महत्वाचं अंग आहे. त्यामुळे जितकी तुम्ही शरीराच्या इतर अंगांची काळजी घेता तेवढीच जिभेची काळजी घेणेही गरजेचे असते. अनेकदा काहींना जिभेवर  लाल डाग दिसतात किंवा काहींच्या जिभेवर निळे किंवा काळे डाग दिसतात. त्याकडे दुर्लक्ष करणे घातक ठरू शकतं. पचनक्रिया सुरळीत नसल्यामुळे ही समस्या अनेकांना उद्भवते. तोंड येण्याचा त्रासही अनेकांना सहन करावा लागतो.

गरिबांचा काजू: शेंगदाणे

शेंगदाण्याला गरिबांचे काजू असे म्हटले जाते. आरोग्याला फायदेशीर ठरणारे अनेक गुणधर्म असलेल्या शेंगदाण्यांचा आपल्या आहारात समावेश करणे अत्यावश्यक आहे. शेंगदाण्याचे तेल आरोग्यासाठी हितकारक ठरते असे अनेक संशोधनातून दिसून आले आहे. शेंगदाण्यामध्ये व्हिटामिन्स, मिनरल्स आणि अनेक अँटी ऑक्सिडंटस उपलब्ध आहेत. यामुळे आपल्या शरीराला ऊर्जा तर मिळतेच याशिवाय अनेक आवश्यक पौष्टिक घटकांचा पुरवठाही केला जातो.

Sunday, 3 May 2020

पायांचीही काळजी घ्यायलाच हवी!

दिवसभरात आपले पाय काय काय आणि किती सहन करत असतात. दिवसभर कामात असणाऱ्या पायांना आरामाचीही गरज असते. बदलत्या ऋतुमानानुसार पायांची  काळजी घेणे आवश्यक असते. पावले स्वच्छ,  सुंदर, नितळ दिसण्यासाठी करता येण्यासारखे उपाय, नखांची काळजी तसेच घरच्या घरी करता येणे शक्य आहे. हवामानानुसार आपल्या पायांची काळजी घेणे क्रमप्राप्त असते. उन्हाळ्यात त्वचा काळवंडते, हिवाळ्यात कोरडी होऊन फुटते आणि पावसाळ्यात फंगल इन्फेक्शन होते. त्यामुळे ऋतुमानानुसार पायांची काळजी घ्यावी लागते.

Saturday, 2 May 2020

प्रदूषण देतेय दम्याला निमंत्रण

मे महिन्याचा पहिला मंगळवार जगभरात दमा दिवस म्हणून ओळखला जातो. यंदा  5 मे म्हणजे हा दिवस साजरा होतोय. फुफ्फुसांचा अतिशय चिवट असा हा आजार आहे. जगभरातील दमेकऱ्यांपैकी जवळपास 10 टक्के दमेकरी भारतीय आहेत. हा रोग थोडा अनुवंशिक असला तरी दम्याच्या वाढत्या प्रमाणामागे प्रदूषण हे  मुख्य कारण आहे. श्वसनमार्गात दाह निर्माण  करणारे वातावरणातले विषाणू आणि  अर्थातच अॅलर्जीला कारणीभूत  असणारे घरातील प्रदूषणकारी घटक  दमा होण्यासाठी धोकादायक ठरू  शकतात.

Wednesday, 29 April 2020

उत्तम आवाजासाठी जपा घशाला...

घसा हा अन्नमार्गातील तसेच श्वसनमार्गातील महत्त्वाचा अवयव आहेच. त्यासोबतच आपण ज्यामुळे आवाज काढू शकतो, ते स्वरयंत्र घशातच असते. त्यामुळे घशाची काळजी घेणे जसे गरजेचे असते, तसेच त्याच्या किरकोळ तक्रारीवरही त्वरित उपचार करणे आवश्यक असते. खोकला, सर्दी झाल्यास आवाज बदलतो. अनेकदा घसा बसतो आणि बोलणे अवघड होते. गायनाचा छंद असलेल्यांना तर घशाची काळजी घेणे क्रमप्राप्त ठरते.

अशी वाढवा रोगप्रतिकार शक्ती

कोरोनाचा फैलाव जगभर वाढला आहे. संसर्गाने होत असलेल्या या आजारापासून वाचायचे असेल तर तुमची रोगप्रतिकारशक्ती सक्षम असली पाहिजे, असे तज्ज्ञांकडून वारंवार सांगितले जाते.  रोगप्रतिकार शक्ती नेमकी कशी वाढवायची, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रोगप्रतिकार शक्ती सक्षम ठेवण्यासाठी तुमचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले असणे गरजेचे आहे. तसेच तुम्ही सोप्या पद्धतीनेही कोरोनापासून स्वतःला दूर ठेवू शकता.

Wednesday, 22 April 2020

आंबे खाण्याचे फायदे

उन्हाळा आला की फळांचा राजा असलेल्या आंब्याचे देखील आगमन होते. आंबा आवडत नसेल असा व्यक्ती क्वचितच शोधून सापडेल. केवळ स्वाद म्हणूनच नाहीतर आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
आंब्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगांचा सामना करण्याची शक्ती वाढते. आंब्यात व्हिटॅमिन ए सह बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-क्रिप्टोक्झ्ॉन्थिन सारख्या फ्लॅवोनाईड्सचे देखील प्रमाण अधिक असते. हे फळ नियमित खाल्ल्याने डोळेदेखील चांगले राहतात. ताजे आंबे हे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.