Wednesday 22 April 2020

आंबे खाण्याचे फायदे

उन्हाळा आला की फळांचा राजा असलेल्या आंब्याचे देखील आगमन होते. आंबा आवडत नसेल असा व्यक्ती क्वचितच शोधून सापडेल. केवळ स्वाद म्हणूनच नाहीतर आंबा खाण्याचे अनेक फायदे आहेत.
आंब्यामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार्‍या अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे रोगांचा सामना करण्याची शक्ती वाढते. आंब्यात व्हिटॅमिन ए सह बीटा-कॅरोटीन, अल्फा-कॅरोटीन आणि बीटा-क्रिप्टोक्झ्ॉन्थिन सारख्या फ्लॅवोनाईड्सचे देखील प्रमाण अधिक असते. हे फळ नियमित खाल्ल्याने डोळेदेखील चांगले राहतात. ताजे आंबे हे पोटॅशियमचा चांगला स्त्रोत आहेत. त्यामुळे हार्टरेट आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते.
आंब्यात मोठय़ा प्रमाणात फायबर आणि पाण्याचे प्रमाण असते. त्यामुळे पचनक्रियेसाठी हे फायदेशीर ठरते.
आंबे खाण्याचे अनेक फायदे आहेत. मात्र यासंबंधी अनेक अफवा देखील पसरवल्या जातात. आंबा खाल्ल्याने वजन वाढते, असे सांगितले जाते. मात्र असे काहीही नाही. इतर फळांप्रमाणेच आंब्यात देखील पोषकतत्वे, फायबर, अँटिऑक्सिडेंट आणि खनिजे असतात. योग्यरित्या हे फळ खाल्यास वजन वाढत नाही. मधुमेह असलेले व्यक्तीदेखील आंब्याचे सेवन करू शकतात, मात्र त्यावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तज्ज्ञांकडून सल्ला घेऊनच सेवन करावे.
आंबा हा त्वचा आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरतो. उन्हाळ्यात शरीरात हायपरअँसिड तयार होते, अशा स्थितीत आंबा खाल्ल्याने शरीरावर पुरळ येऊ शकते. त्यामुळे आंबा खाण्यापूर्वी काही मिनिटे पाण्यात भिजवावा. आंबा हा दुपारी अथवा रात्री मुख्य जेवणासोबत खाऊ नये. 
त्याऐवजी सकाळी अथवा संध्याकाळी स्नॅक म्हणून तुम्ही आंब्याचे सेवन करू शकतात. यामुळे वजन वाढण्याची चिंता राहणार नाही. तुम्ही पुर्ण आंबा सालीसकट खाऊ शकता. मात्र ज्यूस करणे टाळावे, अन्यथा त्यातील फायबर आणि पोषकतत्वे निघून जातात.

No comments:

Post a Comment