Thursday, 23 January 2020

खरंच!शीतपेये प्यायची गरज आहे का?

मधुमेह, लठ्ठपणा,हृदयरोगाला  आमंत्रण
उकाडा असेल किंवा जास्त दमल्यावर अनेकजण-शीतपेय घेतात. पण ,खरंच शीतपेय पिण्याची गरज आहे का? ज्याची शरीराला गरज नाही,असे हे शीतपेय आहे. वास्तविक, शीतपेय घेणे चांगले नसते. त्यामध्ये घातक घटक असतात, असे अनेकदा ऐकतो. मात्र तरीही शीतपेये घेण्याची सवय अनेकांना असते. जंक फूड जसे घातक असते, तसेच शीतपेयेही घातक असतात. त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. शीतपेयांचा शरीरावर अनिष्ट परिणाम होतो. खरंतर शीतपेये ही अनैसर्गिक पेये आहेत. ज्यांचे पोषणमूल्य नगण्य असून, शरीरस्वास्थ्य हानिकारक, असे कार्य असते.

आले खाण्याचे फायदे

खूप थंडी आहे, हुडहुडी भरलीये.. चल जरा आलं घातलेला मस्त गरमागरम चहा पिऊ.. थंडी म्हटलं की आलं घातलेला चहा आलाच.. असा आल्याचा चहा प्यायलाने शरीराला थोडी गरमी मिळते..फक्त शरीर गरम राहावं म्हणून नाही तर थंडीत आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात आणि अशा अनेक समस्या दूर करण्याचे गुणधर्म आल्यामध्ये आहेत. त्यामुळे फक्त चहातूनच नव्हे, तर वेगवेगळ्या प्रकारे आल्याचं सेवन करा आणि थंडीतील आरोग्याच्या समस्यांपासून मुक्ती मिळवा. थंडीमध्ये आल्याचे नेमके काय फायदे आहेत जाणून घेऊ या.

मशरूम खाण्याचे फायदे

अनेकांना मशरूम खायला आवडत नाही. काहीजणांना आवडत असतं. काहीजण घरी असताना मशरून खात नाहीत पण बाहेर कुठेही जेवायला गेल्यावर त्यांना मशरून खावसं वाटत असतं. कारण अनेक पदार्थांना वेगळी चव येण्यासाठी किंवा त्या पदार्थाचे टेक्सचर बदलण्यासाठी मशरूम उपयोगी ठरतं असत. म्हणूनच पिज्जा किंवा बर्गर मध्ये सुद्धा मशरूमचा आवर्जून वापर केला जातो. आज आम्ही तु्म्हाला मशरूमच्या सेवनाचे फायदे सांगणार आहोत. ज्यांचा वापर करून तुम्ही स्वत:च आरोग्य नीट ठेवू शकता.मशरूममध्ये मोठय़ा प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आजारांपासून बचाव होतो. मधुमेह, रक्तदाब, हृदयरोग असणार्‍या व्यक्तींसाठी मशरूम हे चांगले अन्न आहे.

पाणी पिण्याचे फायदे

महाराष्ट्र शासनाने पाणी पिण्यासाठी खास बेल वाजवण्याची व्यवस्था केली आहे आणि तसे आदेशही दिले आहेत. त्यामुळे राज्यातल्या शाळांमध्ये आता दर दोन तासांनी मुलांना पाणी प्यायची आठवण होण्यासाठी व पाणी पिण्यासाठी बेल वाजवली जात आहे. या नियमांचे काटेकोर पणे अंमलबजावणी होते की नाही माहीत नाही,पण यातून थोड्या थोड्या अंतराने पाणी पिणे आवश्यक आहे,हेच यातून अधोरेखित होते. दिवसभरात आवश्यक त्या प्रमाणात पाणी पिणं आरोग्यदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचं ठरतं, असं कितीही सांगितलं तरी त्याकडे बर्‍याचदा दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातून विविध व्याधींचा सामना करावा लागतो.  भरपूर पाणी पिण्याचे फायदे अनेक आहेत.

Wednesday, 22 January 2020

योग्य तेच खा. शिडशिडीत रहा

सध्याचा जमाना वजन घटवणार्‍यांचा आहे. चित्रपटातील नायक-नायिका यांच्या नादाला लागून सध्याची तरुण पिढी स्लिम फिगरवर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. पण आता अशा लोकांसाठी एक चांगली बातमी आली आहे. तथाकथित डाएटच्या नावाखाली जे उपाशी राहावे लागत आहे, ते बंद होण्याच्या मार्गावर आहे, असे म्हणायला हरकत नाही. नवीन संशोधनानुसार वजन घटवण्यासाठी पूर्णत: उपाशी राहाणे आवश्यक नसते. तर योग्य आहार आणि तो योग्य प्रमाणात घेतल्यास वजनावर नियंत्रण मिळवता येते.गेल्या काही वर्षात वजन घटवण्याच्या, स्लीम फिगर मिळवण्याच्या मागे विशेषत: तरुण पिढी लागली आहे. आणि याच प्रयत्नात सुदृढ व निरोगी शरीर या संकल्पनेच्या व्याख्या संपूर्णत: बदलून गेल्या आहेत.

मीठाचा अतिरेक धोक्याचा

मीठ हा आहारातला अत्यावश्यक घटक असला तरी त्याचं प्रमाण र्मयादित असणं गरजेचं आहे. मीठाचं अतिरिक्त सेवन आरोग्यविषयक अनेक प्रश्नांना जन्म देतं. मीठाच्या अतिरिक्त सेवनानं उच्च रक्तदाब, हृदयविकार, जाडी अथवा पक्षाघात यासारखे धोके वाढतात. त्यामुळेच मीठाऐवजी सैंधव वापरणं उपकारक ठरतं. शरीरात मीठाचं जास्तीचं प्रमाण कमी करण्यासाठी काही पथ्य पाळायला हवी.  आहारातील बीन्सचं प्रमाण वाढवल्यास शरीरातील मीठाचं प्रमाण कमी होण्यास मदत होते.

Tuesday, 21 January 2020

हिंगाचे आरोग्यदायी फायदे

विविध पदार्थांमध्ये वापरला जाणरा महत्त्वाचा घटक म्हणजे हिंग. हिंगामुळे पदार्थांना विशिष्ट चव प्राप्त होते. परंतु हिंगामध्ये औषधी गुणधर्मही आहेत. त्यात पोटाचे विकार तसेच पचनासंबंधीच्या तक्रारींवर हिंग गुणकारी ठरतो, हे बहुतेकांना माहीत आहे. मात्र, या व्यतिरिक्तही हिंगाचे आरोग्यदायी लाभ आहेत. त्या विषयी जाणून घेऊ..