कवठ साधारण छोट्या नारळासारखं दिसतं, त्याला इंग्लिशमध्ये 'वूड अॅपल्स' म्हणतात.कवठ हे रुटेसी कुळातील फळ आहे. कवठाची साल हिरवट पांढऱ्या रंगाची खरबरीत व जाड असते. तर त्याच्या झाडाची पाने आकाराने बारीक असतात. कवठाच्या आतील गर विटकरी रंगांचा असून चवीला आंबट-गोड असतो. ते पिकलेलं आहे की नाही, हे बघण्यासाठी त्याची 'बाउन्स टेस्ट' उपयोगी पडते. ते कठीण पृष्ठभागावर पाडा. ते बाउन्स झालं, तर त्याचा अर्थ ते पिकलेलं नाही. पिकलेलं असेल, तर ते जमिनीवर एक विशिष्ट आवाज करून पडेल आणि बाउन्स होणार नाही. पूर्णपणे पिकलेल्या कवठाचा गर फिकट करड्या किंवा 'टॉफी माकन' रंगाचा असेल. कवठ हा विटा-कॅरोटिनचा अतिशय उत्तम स्रोत आहे. हे बिटा-कॅरोटिन शरीरात व्हिटामिन 'ए'मध्ये रूपांतरित होतं. कांती नितळ होणं आणि दृष्टी क्षीण न होणं, यासाठी ते उपयोगी पडतं. कवठात व्हिटामिन 'सी' चांगल्या प्रमाणात असल्यानं ते रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी उपयोगी पडू शकतं. संसगांशी लढण्यासाठी त्याचा उपयोग होतो. या फळातून रायबोफ्लेविन, कॅल्शिअम, आयर्न आणि फॉस्फरस ही खनिजही मिळतात. कवठ हे शीतकारी, पाचक फळ आहे. पचन वाढवणं, यकृत आणि मूत्रपिंडं 'क्लिन्झ' करण्यासाठी ते उपयोगी पडतं. या फळात अँटी-मायक्रोबिअल गुणधर्म असून, ते खाल्ल्यामुळे घशाला बरं वाटतं. कवठ पचनसंस्थेचं रक्षण करतं. पोटामध्ये अल्सर होतो तेव्हा ते उपयोगी पडतं. अपचन आणि बद्धकोष्ठता यांच्यावर गुणकारी ठरतं. प्रोटिन्स भरपूर प्रमाणात असतात आणि स्नायूंना झालेली दुखापत कमी करण्यासाठी उपयोग होतो. चयापचयाला बळ मिळतं. त्वचा आणि केसांसाठी चांगलं आहे. कवठ प्रामुख्याने पिकलेलेच खावे. कच्चे कवठ खाल्ल्याने सर्दी, खोकला आणि डोकेदुखी होऊ शकते. पिकलेल्या कवठाची चटणी छान लागते, यासाठी कवठ फोडा आणि त्यातल्या गरातले मोठे तंतू काढून टाका. हा गर हलके स्मॅश करा आणि त्यात तीन टेबलस्पून गूळ, चिमूटभर हळद, तिखट, मीठ, हिंग आणि जिरे घाला. हे सगळं मिश्रण मिक्सरमधून फिरवून घ्या. झाली तुमची चटणी तयार! जेवणात वापर करा.
Friday, 30 October 2020
कवठ

Thursday, 15 October 2020
दीर्घ श्वसनाचे फायदे
श्वास म्हणजे जगणे. आणि तेच दुर्लक्षित केलं जातं. ज्या प्रमाणात श्वसन करायला हवे ते होत नाही आणि मग परिणाम आरोग्यावर दिसायला लागतात. जेव्हा जेव्हा आपल्याला उसंत असते तेव्हा तेव्हा दीर्घ श्वास घ्यायला हवे. व्यायामाचा भाग म्हणून नाही तर जगण्याचे एक रूटीन करायला हवे. व्यायाम, प्रणायम आले की बरीच जन कंटाळा करतात. पण त्यातच संपूर्ण आरोग्य दडलेले आहे. कमीत कमी दीर्घ श्वसन तरी करायलाच हवे. त्याचे फायदे काय असतात ते पाहूया. शरीरातील 70 टक्के विषारी घटक हे श्वसनाद्वारे बाहेर टाकले जातात. यामुळे शरीरातील बाकी संस्थांचे हे काम वाचते व आरोग्य उत्तम राहते. मेंदूवरील ताणही कमी होतो. थकवा आल्यास किंवा ताण आल्यास ताठ बसावे व दीर्घ श्वसन करावे. यामुळे ताण काही वेळातच हलका होईल. दीर्घ श्वसनामुळे शरीरही आरामदायक स्थितीत येते. त्यामुळे शरीरातील स्नायूंना आलेला अनावश्यक ताण नाहीसा होतो व स्नायू सैलावतात. रक्तातील हिमोग्लोबीनचा स्तर वाढतो त्यामुळे शरीरात रक्त प्रवाह वाढून शरीरातील प्रत्येक भागाला त्याचा फायदा होतो खासकरून पचनक्रिया सुधारण्यासाठी दीर्घ श्वसनाचा खूप फायदा होतो. शरीरातील पेशीन् पेशी कार्यक्षम होते. त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्तीही सुधारते.फुफ्फुसांचा पूर्ण वापर होतो, त्यामुळे फुफ्फुसांचे आरोग्य सुधारते.श्वसन दीर्घ झाल्यामुळे रक्तात ऑक्सिजन मिसळण्यासाठी व शरीरात रक्तपुरवठा करण्यासाठी हृदयाला जास्त कष्ट करावे लागत नाहीत. त्यामुळे हृदयावर ताण येत नाही व त्याचे आरोग्य उत्तम राहते. दीर्घ श्वसन केल्यामुळे मणका, मेंदू व मज्जारज्जू इत्यादींमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा होऊन त्यांची कार्यक्षमता सुधारते. दीर्घ श्वसन केल्यामुळे रक्तातील कार्बन डायऑक्साईड बाहेर पडते व रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढल्याने रक्त शुद्ध होते. असे आहे दीर्घ श्वसनाचे फायदे. तर मग आतापासूनच प्रारंभ करा... यासाठी कुठेही जायची गरज नाही. आहे त्या स्थितीत फक्त श्वसन कडे लक्ष केंद्रित करून दीर्घ श्वास घेऊन बघा आणि दोनच मिनिटात फरक जाणवेल.
Tuesday, 7 July 2020
जायफळाचे सेवन करण्याचे फायदे
अनेक विकारांवर केल्या जाणार्या घरगुती उपचारांमध्ये जायफळाचा उपयोग फार जुन्या काळापासून चालत आला आहे. जायफळामध्ये बॅक्टेरियाचे संक्रमण रोखणारी तत्वे असून यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सचे प्रमाणही मुबलक आहे. त्यामुळे याच्या उपयोगाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. आयुर्वेदानुसार जायफळ अनेक विकारांवर गुणकारी आहे. अपचन, गॅसेसमुळे पोट फुगल्यास किंवा पचनासंबंधी इतर तक्रारी असल्यास दोन मोठे चमचे जायफळाची पूड आणि पाव चमचा सुंठ पूड एकत्र करावे. भोजन करण्याच्या अर्धा तास आधी या मिर्शणातील १/८ चमचा पावडर गरम पाण्यासोबत सेवन करावी. तसेच ज्यांना अपचनाचा त्रास वारंवार होत असेल त्यांनी एक कप उकळत्या पाण्यामध्ये तीन वेलदोडे, पाव चमचा सुंठ पूड आणि एक चिमुटभर जायफळाची पूड घालून हे मिर्शण चांगले उकळावे आणि या काढय़ाचे सेवन करावे.
जेवताना मांडी घालून बसण्याचे फायदे
जेवायला जमिनीवर मांडी घालून बसल्याने अर्धपद्मासनाची स्थिती निर्माण होते. जमिनीवर ताट ठेवून जेवताना अन्नाचा घास घेण्यासाठी वाकावे लागते. या होणार्ा शारीरिक हालचालीमुळे पोटाजवळील स्नायूंवर दाब पडतो. त्यामुळे पचनाची क्रिया सुधारते. जमिनीवर बसून जेवल्याने मेंदू शांत होतो व जेवणावर अधिकाधिक लक्ष केंद्रित होते. त्यामुळे मेंदू शांत होतो. यामुळे अतिप्रमाणात खाण्याची वृत्ती कमी होते आणि वजनही काबूत राहते. पद्मासनात जेवायला बसल्याने पाठ, कंबर आणि पोटाजवळील स्नायूंवर ताण आल्याने शरीर लवचिक व आरोग्यदायी बनण्यास मदत होते.
Thursday, 25 June 2020
योगासनाच्या मार्गदर्शनासाठी अॅप
योगी फाय (YogiFi)
पर्सनलाईज योगासनाच्या प्रशिक्षणासाठी हे अॅप प्रचंड लोकप्रिय आहे. नियमित सत्रांशिवाय लहान मुले, ज्येष्ठ नागरिक तसेच गर्भवती महिलांसाठी फायदेशीर असणारी योगांची सत्रेही इथे उपलब्ध आहेत. प्राथमिक पातळीवर वॉर्मअप्स, प्राणायाम, वेगवेगळ्या प्रकारची आसनांची विविध सत्रे निश्चितच फायदेशीर आहे. विशेष म्हणजे, अगदी प्राथमिक पातळीपासून योग शिकायचा असल्यास तीही सुविधा इथे उपलब्ध आहे. याशिवाय तुमच्या नियमित योगांच्या सत्रांचे विश्लेषण शेवटी दिले जाते.

Saturday, 20 June 2020
योगा सर्वांसाठी उपयुक्त
पूर्ण जगाने योगशास्त्राला डोक्यावर घेतले आहे. एकविसाव्या शतकातील संगणकाच्या युगामध्ये प्रत्येक जण ताणतणावग्रस्त होतो आहे. बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव अशा अनेक कारणांमुळे आजार उद्भवत आहेत. त्यामुळे ऐन तारुण्यात कामातील कार्यक्षमता आणि गुणवत्ता यावर विपरीत परिणाम होत आहे. या दुष्टचक्रातून सुटण्यासाठी अनेक जण योगसाधनेकडे धाव घेत आहेत. योग हा कल्पवृक्ष आहे. योगामुळे विविध आजारांतून मुक्तता होते. उच्चरक्तदाब, हृदयविकार, मधुमेह, मणक्याचे आजार, मानसिक ताणतणाव, अनेक आजारांवर योगा हा रामबाण उपाय आहे.
Tuesday, 16 June 2020
असे ठेवा मधुमेहाला दूर
आजकाल अबालवृद्धांमध्ये मधुमेहाचे प्रमाण वाढत चालले आहे. मधुमेहामध्ये रक्तातील शर्करेचे प्रमाण वाढते. त्यामुळे इन्सुलिनच्या निर्मितीवर परिणाम होतो. आपल्या दररोजच्या जीवनशैलीमध्ये थोडासा बदल करून मधुमेहावर नियंत्रण करता येऊ शकते. मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी दररोज कडू गोळ्या-औषधे खाण्यापेक्षा हे काही घरगुती उपाय करून पाहा
* तुळशीची पाने- तुळशीच्या पानांमध्ये मधुमेहासाठी आवश्यक असणारे अँटिऑक्सिडेंट आणि तेल असते. त्यामुळे शरीरात युजेनॉल, मेथल युजेनॉल आणि कॅरियाफोलिनच्या वाढीस मदत होते. या घटकांमुळे पॅकिअॅट्रिक बीटा सेल्सचे (इन्सुलिनचा साठा व नियंत्रण करणाऱ्या पेशी) कार्य सुरळीत होऊन इन्सुलिनची संवेदनक्षमता वाढते. तसेच तुळशीच्या पानांमधील अँटिऑक्सिडेंट्समुळे तणावावर नियंत्रण राहण्यास मदत होते.

Subscribe to:
Posts (Atom)