Sunday, 29 March 2020

गूळ खा,मस्त राहा

गूळ आपल्या आहारात असायला हवा. त्याची कारणे पुष्कळ आहेत. पण आपल्या रोजच्या आहारात कमी अधिक प्रमाणात साखर असतेच. संशोधनातून असे दिसून आले आहे की साखरेपेक्षाही गुळ आरोग्यासाठी अधिक चांगला आहेच पण गुळाच्या सेवनाने तजेलदार त्वचा आणि भरदार निरोगी, चमकदार केस यांचा लाभ होतो. रोजच्या आहारातून कांहीशा उपेक्षित राहिलेल्या गुळामध्ये अँटी ऑक्सिडंट, कॅल्शियम, आयर्न व अन्य अनेक खनिजे आहेत. त्यामुळे त्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात.

त्वचेवर अकाली सुरकुत्या येत असतील तर गुळाच्या सेवनाने हे प्रमाण मंदावते. चेहर्‍यावर मुरूमे पुटकुळ्या यांना अटकाव होतो. गुळात पोटॅशियम आहे व ते शरीरातील जादा पाणी कमी करते परिणामी वजन घटण्यास त्याचा हातभार लागतो. त्वचेवरील डाग कमी करण्यासही गुळ महत्त्वाची भूमिका बजावतो व त्यामुळे त्वचा तजेलदार दिसते.
गुळात आयर्न म्हणजे लोह विपुल प्रमाणात आहे. त्यामुळे गुळ खाल्याने केस मजबूत व दाट बनतात. शरीरातील विषारी द्रव्ये कमी होतात व त्यामुळे आपोआपच सौंदर्य खुलते. रक्तशुद्दीच्या कामातही गुळ सहाय्यकारी आहे. त्यामुळे रक्तदोषामुळे जे ब्यूटी प्रॉब्लेम निर्माण होतात ते दूर केले जातात. त्यामुळे असा हा बहुगुणी गुळ आहारात अवश्य समाविष्ट करावा..

No comments:

Post a Comment