आपल्या आहारात विविध भाज्यांचा समावेश असतो. मुळा हा त्यापैकीच एक. उग्र वासामुळे मुळ्याची भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जात नसली तरी अधून मधून या भाजीचे सेवन करणे आरोग्यासाठी हितकारी आहे. कारण त्यामध्ये अनेक पोषणमुल्ये आहेत. कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब आदी कारांवर मुळा गुणकारी आहेच त्याचबरोबर सौंदर्यवृद्धीसाठीही मुळ्याचा वापर होतो. जाणून घेऊ मुळ्याचे हे औषधी गुणधर्म..
ल्ल कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आहारात मुळ्याचा समावेश करायला हवा. मुळ्यात 'क' जीवनसत्त्वाचं प्रमाण बरंच असल्याने तो अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असतो. त्यामुळे कॅन्सरला प्रतिबंध होतो.
1) मुळ्यात उच्च रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्याची क्षमता असते. मुळ्यातल्या पोटॅशियममुळे सोडियम आणि पोटॅशियमची शरीरातील पातळी योग्य प्रमाणात राहते.
2) मधुमेहींसाठीही मुळा वरदान ठरतो. मुळा खाल्ल्याने मधुमेहींच्या शरीरातील इन्शुलिनची पातळी वाढत नाही.
3) वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी तसंच कमी करण्यासाठी मुळा अत्यंत उपयुक्त आहे.
4) दमा किंवा अस्थमा असणार्या रुग्णांना मुळ्याच्या सेवनाने आराम मिळू शकतो.
5) मुळ्याच्या सेवनामुळे वातावरणातल्या बदलांमुळे होणारे त्रास आणि अँलर्जीपासून श्वासनलिकेचा बचाव होतो.
6) मुळ्यातलं 'क' जीवनसत्त्वं आणि अँटी बायोटिक मोठ्या प्रमाणात असते.
No comments:
Post a Comment