आजारपण दूर करते
हिवाळ्यात आपल्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. थंडीची भीती देखील असते. ग्रीन टी पिण्यामुळे रक्तवाहिन्या बळकट राहतात. यात व्हायरल इन्फेक्शन दूर करणारे गुणधर्म देखील आहेत, जे फ्लूपासून बचाव देखील करतात. ग्रीन टी देखील दिवसाचा थकवा दूर करतो. अस्वस्थता आणि निद्रानाशच्या तक्रारीपासूनही मुक्त करते. हिवाळ्यात ज्या लोकांना नैराश्याची तक्रार असते त्यांनी ग्रीन टी आवश्य प्यावे. ग्रीन टी वजन वाढण्यासही मदत करतो.
Thursday, 31 October 2019
Wednesday, 30 October 2019
दंत आरोग्यासाठी पथ्ये...
माऊथवॉश : दातांच्या स्वच्छतेसाठी माऊथवॉश वापरणे खर्चिक आहे. मात्र, ही चांगली सवय आहे. तोंडातील अपायकारक जीवाणू माऊथवॉशमुळे दूर होतात. त्याचप्रमाणे, दातांत अडकलेल्या पदार्थांची दुर्गंधी नष्ट होते. दातांचे पोषण होते. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश केल्यास दात निरोगी होण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉशने ताजेतवाने वाटून तोंडातून चांगला गंधही येतो.
कॅल्शियमयुक्त पेस्टचा वापर : अनेक कंपन्या बाजारात कॅल्शिअमयुक्त पेस्ट असल्याचा दावा करतात. परंतु, यांपैकी योग्य बँडची निवड करावी. ती पेस्ट वापरल्यामुळे फायदा झाला तरच तिचा वापर सुरू
ठेवावा.
योग्य आहार : योग्य, पोषक आहार आणि दाताच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे. कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात अधिक घ्यावेत. त्याचप्रमाणे गोड पदार्थांचा वापर कमी करावा. प्रत्येक वेळी काही खाल्ल्यानंतर
पाण्याने व्यवस्थित गुळणी करावी. त्यामुळे, दातातील अन्नपदार्थाचे कण निघून जाण्यात मदत होते. जंक फूड व गोड पदार्थांएवजी दूध, दही, ज्यूस, संत्री, हिरव्या भाज्या, सुकामेवा यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. आयोडिन, पोटॅशिअम, कॉपर, झिंकयुक्त आहार घ्यावा.
जिभेची सफाई : काहीही खाल्यानंतर पदार्थांचे सूक्ष्म कण जिभेवर राहतात. त्यातून संसर्ग होऊन दातांचे आरोग्य बिघडू शकते. जीभ नियमितपणे साफ करावी. तंबाखूसेवन टाळावे : तंबाखूसेवनाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. तंबाखूमधील निकोटिनमुळे दात सडतात. त्यातून कर्करोगालाही आमंत्रण मिळते.त्याचप्रमाणे मखाच्या आंतरिक भागाशी संबंधित रोग होण्याची शक्यता वाढते. सोडा, कॉफी आणि मद्यसेवनही शक्यतो टाळावे किंवा अतिशय कमी करावे. या पदार्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.

हिवाळ्यात ठेवा हृदय रोगांवर नियंत्रण
देशात दरवर्षी हृदयविकाराची संख्या वाढत आहे आणि दरवर्षी 24 लाख लोकांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका बनतो आहे. एका नव्या संशोधनात म्हटलं आहे की, हे हृदयविकाराचा फास तारुण्यापासूनच भारतीयांभोवती आवळा जात आहे. विकसित देशांमध्ये हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीच्या आजारामुळे होणाऱ्या मृत्यूची संख्या 22.8 टक्के आहे, तर भारतात 70 वर्षांखालील 52.2 टक्के मृत्यू या आजारामुळे होत आहेत. हृदयविकाराचा झटका 10 ते 14 टक्के शहरी भागातील लोकांना येतो आहे तर ग्रामीण भागातील प्रमाण 5 ते 7 टक्के इतके आहे.
Monday, 21 October 2019
कडू कारले आरोग्याला चांगले
चवीने कडू असलेले कारले हे आरोग्यासाठी अत्यंत हितावह आहे. कारले भारतात सर्वत्र पिकते व अतिप्राचीन काळापासून कारल्याचा उपयोग फळभाजी बरोबरच औषधातही केला जातो. संस्कृतमध्ये कंदुरा (करवल्ली), हिंदीमध्ये करेला, इंग्रजीमध्ये कॅरिला फूट्र किंवा बिटर गार्ड म्हणून ओळखले जाणारे कारले ही वनस्पती कुकरबिटेसी या कुळातील आहे. कारले हिरवट, पांढरसर, काळसर हिरव्या रंगांची आणि पिकल्यानंतर आतून लाल, केशरी होतात. कारली मोठी आणि लहान अशा दोन प्रकारची असतात, तर रंगभेदामुळे कारल्याचे पांढरी, हिरवी असेही दोन प्रकार आढळतात. आयुर्वेदानुसार कारली पित्तशामक, वातानुलोमक, कृमिघ्न व मूत्रल आहेत.
Subscribe to:
Comments (Atom)