माऊथवॉश : दातांच्या स्वच्छतेसाठी माऊथवॉश वापरणे खर्चिक आहे. मात्र, ही चांगली सवय आहे. तोंडातील अपायकारक जीवाणू माऊथवॉशमुळे दूर होतात. त्याचप्रमाणे, दातांत अडकलेल्या पदार्थांची दुर्गंधी नष्ट होते. दातांचे पोषण होते. ब्रश केल्यानंतर माऊथवॉश केल्यास दात निरोगी होण्यास नक्कीच मदत होते. माऊथवॉशने ताजेतवाने वाटून तोंडातून चांगला गंधही येतो.
कॅल्शियमयुक्त पेस्टचा वापर : अनेक कंपन्या बाजारात कॅल्शिअमयुक्त पेस्ट असल्याचा दावा करतात. परंतु, यांपैकी योग्य बँडची निवड करावी. ती पेस्ट वापरल्यामुळे फायदा झाला तरच तिचा वापर सुरू
ठेवावा.
योग्य आहार : योग्य, पोषक आहार आणि दाताच्या आरोग्याचा जवळचा संबंध आहे. कॅल्शियमयुक्त पदार्थ आहारात अधिक घ्यावेत. त्याचप्रमाणे गोड पदार्थांचा वापर कमी करावा. प्रत्येक वेळी काही खाल्ल्यानंतर
पाण्याने व्यवस्थित गुळणी करावी. त्यामुळे, दातातील अन्नपदार्थाचे कण निघून जाण्यात मदत होते. जंक फूड व गोड पदार्थांएवजी दूध, दही, ज्यूस, संत्री, हिरव्या भाज्या, सुकामेवा यांचा वापर अधिक करावा. जीवनसत्त्वयुक्त पदार्थांचे प्रमाण वाढवावे. आयोडिन, पोटॅशिअम, कॉपर, झिंकयुक्त आहार घ्यावा.
जिभेची सफाई : काहीही खाल्यानंतर पदार्थांचे सूक्ष्म कण जिभेवर राहतात. त्यातून संसर्ग होऊन दातांचे आरोग्य बिघडू शकते. जीभ नियमितपणे साफ करावी. तंबाखूसेवन टाळावे : तंबाखूसेवनाचे आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होतात. तंबाखूमधील निकोटिनमुळे दात सडतात. त्यातून कर्करोगालाही आमंत्रण मिळते.त्याचप्रमाणे मखाच्या आंतरिक भागाशी संबंधित रोग होण्याची शक्यता वाढते. सोडा, कॉफी आणि मद्यसेवनही शक्यतो टाळावे किंवा अतिशय कमी करावे. या पदार्थांमध्ये फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते.
No comments:
Post a Comment