Monday, 24 February 2020

सर्दीखोकल्यासाठी घरगुती उपाय

वातावरण बदलामुळे सर्दी, खोकला झालाय का? करा 'हे' घरगुती उपाय अनेकजण सर्दी-खोकला झाला की लगेच डॉक्टरकडे धाव घेतात आणि अॅलोपॅथीची औषधं घेतात. मात्र, त्याच्या दुष्परिणामांचा अजिबात विचार केला जात नाही. सर्दी-खोकला हा त्या मानाने अगदी सामान्य आजार असून, त्यावर आयुर्वेदिक पद्धतीने घरगुती उपाय करणे अधिक चांगलं असतं.

डाळिंबाचे सेवन करा:फायदेच फायदे

आपल्या शरीराचं कार्य सुरळीत चालण्यासाठी अनेक पोषक तत्वांची आवश्यकता असते. ही सर्व पोषक तत्व आपल्याला आहारातून मिळतात. त्यामुळे आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक असतं. अशातच डाळिंब आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतं. यामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात.

Thursday, 20 February 2020

हृदयविकार टाळण्यासाठी पाच गोष्टी

हृदयविकार हा आपल्या देशात सर्वात मोठा आजार होत चालला आहे. यासाठी देशाचा पैसाही खूप वाया जात आहे. प्रत्येकाने थोडीफार काळजी घेतली तर स्वतः आरोग्य पूर्ण राहालाच शिवाय देशाचे आर्थिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल. त्यामुळे प्रत्येकांनी काही गोष्टी पाळायलाच हव्यात. या फार सोप्या पाच गोष्टी आहेत. त्या सांभाळल्या की हृदयविकाराची भीती बरीच कमी होईल.

Wednesday, 29 January 2020

टोमॅटो रसाचे सेवन

टोमॅटो कच्चा आणि शिजवून अश्या दोन्ही प्रकारे खाल्ला जाऊ शकत असून, याच्या रसाचे सेवनही आवर्जून केले जात असते. या रसामध्ये क्षार, जीवनसत्वे मुबलक प्रमाणात असून, यामध्ये अँटी ऑक्सिडंट्सही मोठ्या प्रमाणावर आहेत. या रसाच्या नियमित सेवनामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. पण ज्याप्रमाणे नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे या रसाच्या सेवनाला फायदा आणि नुकसान या दोन बाजू आहेत. या फळामध्ये क्षार आणि जीवनसत्वे मुबलक मात्रेमध्ये असली, तरी यामध्ये कबरेदके आणि प्रथिने मात्र जवळजवळ नाहीतच. त्यामुळे या रसाचे सेवन करताना शरीराला आवश्यक ती कबरेदके आणि प्रथिने मिळतील या दृष्टीने आहार घेतला जावा. टोमॅटोमध्ये लायकोपीन असून, यामुळे शरीराला रोगप्रतिकारशक्ती लाभते.

Tuesday, 28 January 2020

कानात तेल घालणे अयोग्यच, बुरशीची शक्यता

कानाची काळजी घ्या
कान सुकला, कानात खाज येऊ लागली किंवा कानात दुखत असेल तर अनेक जण कानात तेल घालतात. मात्र कानात तेल घालणे योग्य नसल्याचे तज्ञ म्हणतात. लहानपणी आपली आजी किंवा आई आपण झोपल्यानंतर आपल्या कानात तेल घालायची. आता तुम्हीदेखील तुमच्या मुलांच्या कानात तेल घालता. कानात तेल घालणे चांगले असते, त्यामुळे कानात मळ साचत नाही असे म्हटले जाते. मात्र, कानात तेल टाकणे हे अयोग्य असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.

हे माहीत आहे का?

सद्य:स्थितीत रक्तगटांविषयी बहुतेकांना माहिती असते. कोणत्या रक्तगटाचे रक्त कोणत्या रक्तगटाच्या व्यक्तीला चालतं याचीही बर्‍यापैकी माहिती असते. परंतु रक्तगटाशी संबंधित धोक्यांबाबत फारसं जाणून घेतलं जात नाही. आज त्याचीच माहिती घेऊ..
लाल रक्तपेशींच्या पृष्ठभागावर अँटिजेन्स नामक घटक असतात. यामुळे प्रत्येक रक्तगटाच्या व्यक्ती काही प्रकारच्या विकारांचा प्रतिकार करू शकतात तर काही विकारांना बळी पडू शकतात. ए, बी, ओ आणि एबी हे प्रमुख रक्तगट आहेत. रक्तगटाचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असणं आरएच या घटकावर अवलंबून असतं. आरएच हा सुद्धा अँटिजेन आहे. रक्तगटाशी संबंधित विकार होऊ नये या हेतूने आपण जीवनशैलीशी संबंधित बदल करू शकतो. 

नकारात्मक विचार टाळा

सध्याच्या धावपळीत सतत काही ना काही समस्या येत असतात. त्यामुळे माणूस सतत तणावाखाली असतो. या तणावात माणसाच्या मनात एक प्रकारची भीती उद्भवते. या भीतीतून नकारात्मक विचार यायला लागतात. पण हे नकारात्मक विचार आपल्याला आणखीणच तणावाच्या खाईत लोटतात. त्यातून मनात सातत्याने येणारे नकारात्मक विचार आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्त्वावर विपरीत परिणाम घडवून आणतात. हे टाळण्यासाठी आपल्याला सातत्याने सकारात्मक विचारांचा पाठलाग करायला हवा आहे. यासाठी काही गोष्टी करणे भाग आहे.